
नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नवीन नाशिक (Navin Nashik) परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे (Liquor stores) आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना व महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने
हे दारूचे दुकान बंद करावे अशा मागणीचे निवेदन (memorandum) आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey) यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan D.) यांना दिले.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, परिसरातील महाकाली चौक व दत्त चौक हि मोठी रहिवाशी वसाहत असुन या ठिकाणी सुरु असलेल्या देशी दारू दुकानामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देशी दारुच्या दुकानांमुळे येथील नागरिकांचे जनजीवन धोक्यात आलेले आहे.
हा भागातील रहिवाशी रोजंदारीने काम करणारे कामगार या दुकानांमुळे नशेचे शिकार होत असुन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे तर लहान मुले देखिल या नशेचे शिकार होत आहेत. लहान मुले, तसेच गरीब कामगार वर्ग या देशी दुकानांमुळे उद्ध्वस्त होत असल्याने महिलावर्गाकडुन त्वरित याठिकाणचे देशी दारू दुकान (Liquor stores) बंद करण्याची मागणी होत आहे.
या दारू दुकानांमुळे येथील महिला व लहान मुलांचे मनावर विपरीत परिणाम होत असून यामुळेच अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत गुन्हेगारी (criminality) देखील वाढलेली आहे. तसेच महिलांवर्गाला या दारु पिणाऱ्यांकडून शिवीगाळ व छेडछाडीचे प्रकार होत असल्याने महाकाली चौक व दत्त चौक येथील सुरू असल्याचा देशी दारुचे त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांसह आमदार सीमा हिरे व रश्मी हिरे बेंडाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.