वातावरणातील सातत्य तसेच राहणार: माणिकराव खुळे

वातावरणातील सातत्य तसेच राहणार: माणिकराव खुळे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शहर व जिल्हावासीय सध्या अनुभवत असलेले पहाटेचे सरासरी इतके किमान तर सरासरी पेक्षा काहीसे कमी दुपारचे कमाल तापमान (Maximum temperature) अशी दोन्ही तापमाने बुधवार दि.१ मार्चपर्यन्त आहे तशीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule, Retired Meteorologist) यांनी वर्तविला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात (maharashtra) रात्रीचा हलकासा गारवा (cold) व दिवसाचा काहीसा कमी ऊबदारपणाही तसाच राहून दुपारचे वातावरणही बुधवारपर्यन्त सुसह्य भासेल, असे वाटते. पहिल्या पश्चिमी झंजावाताचा सोमवारपर्यंत परिणाम जाणवत असतांनाच लगेच मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासुन नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तर भारतात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखण्ड अशा ३ राज्यात दि.२७ व २८ फेब्रुवारी व १ मार्च ला गडगडाटीसह पाऊस (rain) व बर्फीबारीची (snowfall) शक्यता कायम आहे.

गुरुवार दि.२ मार्चपासुन पहाटेचे किमान सरासरीइतके तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने अधिक राहण्याची शक्यता जाणवते. महाराष्ट्रात सध्या तरी अजुन पाऊस अथवा गारपिटीची शक्यता जाणवत नसल्याचेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com