
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रिकानुसार आषाढी वारीसाठी (ashadhi wari) पंढरपूरला (pandharpur) जाणाऱ्या भाविकांच्या व वारकऱ्यांच्या जड आणि हलक्या वाहनांसाठी पथकरामधून सवलत देण्यात आली आहे...
त्यासाठी लागणारे पास (Pass) नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस (Police) प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रिकानुसार दि. 07 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये पंढरपूर येथे जाताना व येताना भाविक व वारकऱ्यांच्या जड आणि हलक्या वाहनांसाठी पथकरांतून सवलत देण्यात आलेली आहे.
पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी हलक्या व जड वाहनांनी जाणाऱ्या भाविकांनी त्यांच्या वाहनांसाठी पासेस उपलब्ध करून घ्यावेत. याकरिता नाशिक शहर पोलीस आयुक्तालय (Police Commissionerate) हद्दीतील 13 पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून पास वितरित केले जात आहे.
तरी संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे भाविक आणि वारकऱ्यांनी ते राहत असणाऱ्या पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या वाहनांसाठी पास उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहन उपायुक्त परिमंडळ १ अमोल तांबे (Amol Tambe) यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आषाढीवारी मिमित्ताने पंढरपुर येथे जाणाऱ्या मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी दिली आहे.
भाविकांना या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी या कार्यालयामार्फत 7 जुलै 2022 पासून ते 15 जुलै 2022 पर्यंत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याअनुषंगाने भाविकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथून पथकर सवलत प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे.