असे करा गर्भवती महिलांचे लसीकरण....

असे करा गर्भवती महिलांचे लसीकरण....

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कोरोना विषाणूसोबत (Covid 19) लढण्यासाठी लस अतिशय महत्वाची आहे. गरोदर असलेल्या स्त्रियांसाठी (Pregnant woman) सकारात्मक पाऊल प्रशासनाने उचलले आहे. त्यामध्ये लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers) विशेष सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत....

कोरोना विषाणूचा (Covid 19) सामना करण्यासाठी लस घेणे अत्यावश्यक आहे. देशभरात लसीकरन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गरोदर स्त्रियांना गरोदरपणात रांगेत उभे राहण्याबाबत अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष सुविधा केंद्रावर उपलब्ध करून द्यावी याची मागणी करण्यात आली होती. यानिमित्ताने जिल्हा आरोग्य प्रशासनाने केंद्रांवर सूचना दिल्या आहेत.

तसेच गरोदर स्त्रियांनी देखील याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी नोंदणी करूनच केंद्रावर जावे. तिथे असलेल्या समन्वयकांसोबत बोलून वेगळी रांग लावायची आणि लस घ्यायची आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमावलीचा काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे.

हे करा

- लसीसाठी नोंदणी करा

- आपला स्लॉट बुक केल्यावर गर्दी न करता वेळेत केंद्रावर हजर व्हा!

- तेथे पोहचल्यावर समन्वयकांना आपल्या गरोदरपणाबाबत माहिती द्या.

- त्यांच्या मार्गदर्शनाने सुरक्षित अंतर ठेवून वेगळी रांग तयार करा.

- आपला क्रमांक आल्यावर लस टोचून घ्या

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com