नाशिक : भूमी अभिलेखच्या लिपिकाला ४० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

नाशिक : भूमी अभिलेखच्या लिपिकाला ४०  हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

नाशिक | Nashik

जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरीचे (Bribery) प्रकार वाढत असून लाचखोरी थांबण्याचे नाव घेत नाही. या लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत विभागाचे (Bribery Department) अधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी ५० हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेखच्या (Land Records) जिल्हा अधीक्षकास अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भूमी अभिलेखमधील लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक तालुक्यातील पळसे (Palse) येथील तक्रारदाराचा जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज होता. मोजणी झाल्यानंतर पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी संशयित नीलेश शंकर कापसे, राहणार मखमालाबाद याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिक : भूमी अभिलेखच्या लिपिकाला ४०  हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले
Nashik : भूमी अभिलेखच्या अधीक्षकांना ५० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

त्यानंतर तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकांची मोजणी करुन त्यामध्ये असलेल्या पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी वैयक्तिक काम केले म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये आणि सदर नकाशावर शासकीय शिक्के तसेच सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे ५० हजार याप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली.

नाशिक : भूमी अभिलेखच्या लिपिकाला ४०  हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले
लासलगावला शेतकऱ्यांचे आंदोलन; कांदा लिलाव पाडले बंद

परंतु, तक्रारदार (Complainant) यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देण्यास सांगितल्याने कापसेने प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत भूमिअभिलेख विभागाच्या लिपिकला  ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

नाशिक : भूमी अभिलेखच्या लिपिकाला ४०  हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले
कदाचित दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच 'मराठी'चा विसर पडलाय; रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटरे यांनी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com