Deshdoot Impact : अखेर ‘ती’ बारव झाली चकाचक

Deshdoot Impact : अखेर ‘ती’ बारव झाली  चकाचक

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

भगूर-देवळाली मार्गावरील (Bhagur-Deolali Road) रेणुका देवी मंदिरासमोरील पाण्याच्या बारवाची (Barav) स्वच्छता (Cleaning) होण्याबाबत देशदूतने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बारवाची स्वच्छता केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे...

येथील रेस्ट कॅम्परोडवर जागृत देवस्थान असलेल्या रेणुकादेवी माता मंदिराच्या (Renukadevi Temple) बारवाची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली होती. राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर रिपाइंचे जिल्हा संघटक संतोष कटारे, शहराध्यक्ष सुरेश निकम, संतोष गायकवाड अधिनी मंदिर व बारव परिसराची पाहणी करून स्वच्छतेबाबत कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्याशी चर्चा केली असता याबाबत 2 दिवसात कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते.

याशिवाय सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कासार, रोहित कासार यांनी याबाबत आरोग्य विभागाला माहिती दिली होती. प्रशासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाचे अभियंता स्वप्नील क्षत्रिय व आरोग्य अधिकारी अमन गुप्ता, निरीक्षक शिवराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास बनसोडे, रफिक शेख, राजेश पवार, दिनेश ठोकळ, योगेश लोणे यांनी स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यात आले. बारवाची स्वछता करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

यात्रोत्सव रद्द

शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतलेला असला तरी करोनाच्या नियमाचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नवरात्रोत्सवात रेणुका देवीचा होणारा यात्रोत्सव कॅन्टोन्मेंट प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार रद्द केला आहे. या काळात कोणीही व्यापारी अथवा व्यावसायिकांनी आपली दुकाने मंदिर परिसरात लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com