भविष्यनिधी कार्यालयात फायलींची 'स्वच्छता'

भविष्यनिधी कार्यालयात फायलींची 'स्वच्छता'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर (satpur) येथील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात (Provident Fund Office) विशेष स्वच्छता अभियान (Cleanliness campaign) राबवण्यात आले. विशेष म्हणजे, या अभियानात जुन्या फायलींचीही 'स्वच्छता' करून सुमारे 900 चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली.

केंद्र सरकारच्या (central government) आदेशानुसार 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत वापरात नसलेले की-बोईस, टाइपरायटर्स (Typewriters),

लिपी प्रिंटर्स, (script printers) फॅक्स मशीन, यूपीएस, मॉनिटर्स, माऊस आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा (Electronic item) लिलाव (auction) करण्यात आला. जुन्या फायलींचा आढावा घेऊन सुमारे 950 फायली काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा लिलावने नऊशे चौरस फुटांपेक्षा जास्त जागा मोकळी करण्यात आली.

पर्यावरण जतनाचा संदेश

मोहिमेत कार्यालय आवारात वृक्षारोपण मोहीम (Tree Plantation campaign) राबवून केळी, पेरू, चिकू, झेंडू आदी झाडांची लागवड करण्यात आली. अनेक ग्राहक आणि निवृत्ती वेतनधारकांना 'आधार' जोडणी व अद्ययावतीकरणाबाबत अडचणींचा सामना करावा लागत होता. हे लक्षात घेऊन 'कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले, असल्याची माहिती क्षेत्रीय भविष्यनिधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com