
नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road
पावसाळा (rainy season) तोंडावर आला तरी नाशिकरोड (nashik road) परिसरातील गटारी (Gutters) व नाल्यांची साफसफाई (Cleaning of drains) महापालिकेने केली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
येथील रेल्वे पुलाखालून सिन्नर फाट्याकडे जाणारा नाला त्वरित साफ करण्याची मागणी करत गवळी समाजाचे नेते जगन गवळी यांनी आंदोलनाचा (agitation) इशारा दिला होता. नालेसफाई सुरु झाल्याने गवळी यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.
जोरदार पाऊस (heavy rain) झाल्यावर नाशिकरोडला रेल्वे पुलाखालील नवले चाळ, चिडे मळा, गवळी वाडा, देवी चौक येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. रेल्वे पुलाखालील भागात पाणी साचल्यावर नागरिकांच्या घरात साप, विंचू, बेडूक आदींचा शिरकाव होतो. संसारपयोगी साहित्यांचे नुकसान होते. सुभाष रोडवरील आणि देवी चौकातील नाला तुंबल्यावर व्यावसायिकांचे नुकसान होते.
नुकसान झाल्यावर महापालिकेचे अधिकारी येतात व पाहणी करून जातात. भरपाई देत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे. तसेच मीना बाजार, आंबेडकर पुतळा चौक, बिटको चौक, दत्तमंदिर चौक, सुभाषरोड, रेल्वे वसाहत, देवळाली गाव पाणी मोठ्या प्रमाणावर साचून वाहतूकीचा खोळंबा होतो. गेल्या वर्षी जुन्या महापालिका इमारतीतही पावसाळी पाणी साचले होते. आज महापालिकेचे अधिकारी आले. त्यांनी नाल्यांची पाहणी केली. नंतर कर्मचारी, साधने व वाहने पाठवून नाले सफाईला सुरुवात केली.