पुरातन बारवेची साफसफाई

पुरातन बारवेची साफसफाई

वावी । वार्ताहर Vavi

पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Punyashlok Ahilya Devi Holkar यांनी उभारलेल्या रामाच्या बारवेची Ramache Barav बजरंग दलाने Bajrang Dal स्वच्छता Cleaning केली.धार्मिकदृष्ट्या व ऐतिहासिक वारसा असलेल्या वावी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चार ते पाच बांरवांची उभारणी केली असून त्याचा प्रत्यक्ष फायदा त्या काळातील ग्रामस्थांना होत होता.

मात्र, ग्रामस्थांच्या दुर्लक्षामुळे केवळ तीन बारव या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यात एका बारवेवर आजही पाणी योजना सुरू आहे तर दुसरी मिठसागरे रोडवरील देवी मंदिराजवळील बारव मोडकळीस आलेली आहे व तिसरी रामाची बारव म्हणतात, तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या बारवेचे रूपांतर कचराकुंडीत झाले होते. येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम हातात घेऊन राम मंदिर परिसर व मंदिरासमोर असलेली पुरातन बारव याची साफसफाई केली.

बारवेत वाढलेली झाडेझुडपे, गवत संपूर्ण स्वच्छ करून पूर्ण बारवं पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आली व पाण्यात पडलेला प्लास्टिक व इतर कचरा काढून नितळ पाण्याचे दर्शन वावी करांना करून दिले. पांडुरंग गिरी महाराज व त्यांचे सहकारी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सर्जेराव वाजे, मंदार केसकर, संजय देशमुख, संतोष भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली वावीतील बजरंग दलाने ही स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

मागील काही वर्षापूर्वी येथील ग्राम विकास संघाने ही पुरातन बारव स्वच्छ केली होती. त्यात जेव्हापासून बारवेची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत ते बारवेची स्वच्छता कधीही झालेली नव्हती. ती स्वच्छता व त्या बारवेचा तळ स्वच्छ करण्याचे काम ग्रामविकास संघाने केले होते. येथील गणेश भक्तांनी यावेळी या बारवेत गणेश मूर्ती विसर्जित करू नये यासाठी ग्रामस्थांना आवाहनदेखील करण्यात आले आहे.

व्यावसायिक दृष्ट्या सदन असलेल्या या बजरंग दलातील सर्व कार्यकर्त्यांनी आपला व्यर्थ व रिकामा जाणारा वेळ आपले कामकाज सांभाळून मंदिर जतन करण्याच्या हेतूने सत्कारणी लावण्याचा काम हाती घेतला आहे त्यामुळे गावातील मंदिरे त्यांचे सुशोभीकरण करून एक नवचैतन्य निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे तसेच परमपूज्य ह.भ.प. पांडुरंग गिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वज्रेश्वरी महादेव मंदिर याच्या दुरुस्तीचे काम पुरातन विभागाच्या परवानगीने लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com