नांदगाव । Nandgoan

कासारी घाटाजवळ टँकर उलटून झालेल्या अपघातात टँकर क्लिनर मयत झाला असून टँकरचालक गंभीर जखमी झाला आहे. पानेवाडी (मनमाड) येथून पेट्रोल भरून जातेगांव येथे खाली करण्यासाठी जात असताना हि घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पानेवाडी (मनमाड) येथून पेट्रोल भरून (एम.एच.०४ जी.सी.३७१८) ते खाली करण्यासाठी जातेगांव जात होता. दरम्यान कासारी घाटाजवळील पुलाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर उलटला.

या अपघातात टँकरमध्ये अडकून क्लिनर गणेश बिडगर याचा जागीच मृत्यू झाला. तर टँकरचालक बाळनाथ बापु आयनेर गंभीर जखमी झाला असून मालेगांव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.