कौटुंबिक वर्चस्वाच्या वादात दोन गटात हाणामारी

अंबड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल
कौटुंबिक वर्चस्वाच्या वादात दोन गटात हाणामारी

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून (Family disputes) दत्त नगर परिसरात परप्रांतीय दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी (fight) अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल (case filed) करण्यात आला असून दोन्ही गटांच्या बारा जणांना पोलिसांनी अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बिहार (bihar) मधील बागलपूर (Bagalpur) येथील रहिवासी असलेल्या नातेवाईकांच्या दोन गटात कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून दोन दिवसांपूर्वी दगडफेक (stone pelting) करत तुफान हाणामारीची घटना चुंचाळे शिवारातील दत्त नगर येथे घडली होती. याघटनेचा व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाला. दरम्यान प्रथम दर्शनी सदरहू घटना हि दहशत माजविण्याचा प्रकार असल्याचे पोलिसांना समजले.

मात्र अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे (Police Inspector Nandan Bagade), पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर (Police Inspector Shrikant Nimbalkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह पोलीस पथकाने सदर घटनेचा तपास करून जखमी पवन सिंग याच्या फिर्यादीवरून अंकेश सिंग,मिंदु राजपूत,भगवान यादव,भोला यादव,टिंकू यादव,सुमित सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेत कैलास प्रसाद हा देखील जखमी झाला. तर दुसऱ्या गटातील मिंदु यादव याच्या फिर्यादीवरून रवी राजपूत,राजेश राजपूत,श्रीकांत सिंग,शालू सिंग,प्रेम राजपूत,विशाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी या घटनेतील बारा संशयितांना अटक केली असून पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम सोनावणे व हवालदार कैलास चव्हाण करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com