मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी सिव्हीलच योग्य

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी सिव्हीलच योग्य
जिल्हा रुग्णालय

नाशिक | Nashik

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical Hospital) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र (Training Center) म्हणून जिल्हा रुग्णालयाची चाचपणी होत आहे....

यानिमित्ताने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर (Dr. Madhuri Kanitkar) यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला (Nashik Civil Hospital) भेट देत पाहणी केली.

जिल्ह्यात यंदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रवेश (Student Admission) देखील होणार असून या महाविद्यालयाचे बांधकाम आरोग्य विज्ञान विद्यापीठालगत असणार आहे. त्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी जिल्हा रुग्णालयाची चाचपणी करण्यात आली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील सुविधांची आणि रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, प्रशिक्षण प्राचार्य डॉ सुशील वाकचौरे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com