...म्हणून मद्यपीने फोडली सिटीलींक बसची काच

...म्हणून मद्यपीने फोडली सिटीलींक बसची काच

सातपूर । Satpur

नाशिक महानगरपालिकेची (Nashik NMC) सिटीलिंक बस सेवा (Citylink Bus Service) सुरू होऊन महिना ही पूर्ण होत नाही तोच टवाळखोराचा उपद्रव सुरू झाला आहे. श्रमिकनगर (Shramiknagar) येथे सिटीलींक बसची काच फोडून वाहनचालकास मारहाण (Beating the driver) केल्याची घटना घडली आहे.

सातपूर (Satpur) येथे सीटीलिंक नंबर (एम एच १५ जी व्ही ७९३९) तपोवन ते श्रमिक नगर रुटवर जात असतांना श्रमिक नगरच्या बसस्टॉपवर थांबली होती. बस ड्रायव्हरने दरवाजा नेहमी प्रमाणे प्रवासी भरण्यासाठी उघडा केला असता, परिसरातील एक टवाळखोर मद्यपान करून बस मध्ये चढला. मात्र बसमध्ये येत असलेल्या टवाळखोराकडून बस मधूनच वाहनचालकाला शिविगाळ (Insulting the driver) सुरु केली. त्यावर वाहनचालकाने टवाळखोर म्हणून दुर्लक्ष केले.

शिव्या देणाऱ्या टवाळखोराने बसला उशीर होत असल्याचे सांगत बाजूने दगड फेकून बसची काच फोडली. वाहनचालक बसचे नुकसान झाले, म्हणून खाली बघण्यासाठी गेला असता वाहन चालकास देखील दगड मारुन जखमी केले. यात बस चालकाच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली आहे.

या नंतर मारझोड करणाऱ्या युवकाचे मित्र आले असता या सर्वांनी मिळवून देखील मारझोड केली. या संबधीत टवाळखोरा विरोधात सातपूर पोलिस स्टेशनमध्ये सरकारी मालमत्तेस नुकसान व वाहनचालकास मारहाण केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पूढील तपास पोलीस निरीक्षक कैलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.