आजपासून सुकेणे पर्यंत सिटीलिंकची बस सेवा

आजपासून सुकेणे पर्यंत सिटीलिंकची बस सेवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगर प्रदेश परिवहन महामंडळाच्या Nashik Metropolitan Region Transport Corporation सिटीलिंक शहर बससेवेचा Citylink city bus service आता कसबे-सुकणेपर्यंत Kasbe Sukene विस्तार झाला असून आज (दि. 13) पासून ओझरमार्गे सीबीएस ते सुकेणे ही शहर बस सुरू होत आहे.

महापालिकेने गेल्या 8 जुलैपासून सुरू केलेल्या शहर बससेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महापालिकेने माहे जुलै 2021 मध्ये असलेली 27 बसेची संख्या आता 145 पर्यंच वाढविण्यात आली आहे. त्यातबरोबर जुलै मध्ये असलेल्या 8 मार्गांची संख्याही वाढून 40 पर्यंत करण्यात आली आहे.अजुनही टप्याटप्याने यात वाढ करण्यात येणार आहे. त्यात गिरणारे, सिन्नर,ओझर, मोहाडी, सायखेडा, त्र्यंबकेश्वर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात आता कसबे सुकेणेची भर पडली आहे.

करोनात निर्बंध असतानाही या बसेसला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेने बसेस वाढविल्या आहेत. करोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर सिटीलिंक बस ओझरपर्यंत सुरू झाली. पुढे एचएएलने सुकेणेकडे वाहनांना प्रवेश नाकारल्याने बस सुकेणेसह दहा ते बारागावांना मिळत नव्हती. कसबे सुकेणेच्या नागरिकांनी पाठपुरावा केल्याने सिटीलिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी या मार्गावर बस सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून सीबीएसहून पहाटे 5 ते सायंकाळी 7 पर्यंत दर अर्ध्या तासाला एक बस ओझरमार्गे कसबे सुकेणेसाठी असणार आहे.

शहर बससेवेतून रोज 50 हजार नाशिककरांचा प्रवास

नाशिक । गीतिका सचदेव

नाशिक महापालिकेच्या शहर बससेवेला नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हळुहळू बसेसची संख्या आणि मार्ग वाढल्याने शहर बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे.

नाशिक शहरात बस सेवा 8 जुलै 2021 पासून सुरू झाली. त्यावेळी केवळ 27 बसेस कार्यरत होत्या. पाच महिन्यातच म्हणजे डिसेंबरमध्ये ही संख्या 145 वर गेली. दैनंदिन मार्गावरील बसेसची संख्या 8 वरून 40 पर्यंत वाढली. महापालिका हद्दीबाहेर त्र्यंबकेश्वर, सिन्नर, सायखेडा, गिरणारे, मोहाडी, ओझर या ठिकाणी बससेवा सुरू करण्यात आली. शहर बसमधून दररोज सरासरी 50 हजार प्रवासी प्रवास करतात. शहर बस सुरू झाल्यापासून एकूण 35 लाख 51 हजार नागरिकांनी शहर बसचा लाभ घेतला आहे. सुमारे 4 हजार नागरिकांनी पास सुविधेचा पर्याय निवडला आहे.

15 लाखांचा महसूल

शहर बसेसमधून सरासरी एका दिवसात 14 लाख 45 हजार रुपयांचा महसूल मिळत आहे.या बसेसचे ट्रॅकिंगही अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन केले जात आहे. तसेच प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करण्याचा पर्याय दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com