लाईनमनला शिवीगाळ; कर्मचार्‍यांतर्फे शहराचा वीजपुरवठा खंडीत

लाईनमनला शिवीगाळ; कर्मचार्‍यांतर्फे शहराचा वीजपुरवठा खंडीत

मनमाड । प्रतिनिधी Manmad

थकित बिल वसुलीसाठी (Exhausted bill recovery) गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या (Power Distribution Company) लाईनमनला वाढीव बिल दुरूस्तीच्या कारणावरून झालेल्या वादात थकबाकीदारांतर्फे शिवीगाळ करण्याचा प्रकार शहरातील कोतवालीनगर भागात घडला.

या घटनेने संतप्त झालेल्या वीज वितरणच्या (Power distribution) कर्मचार्‍यांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी नियमानुसार कारवाई केल्याचे सांगितल्याने कर्मचार्‍यांनी संपुर्ण शहराचा अर्धा तास तर कोतवालनगर, क्रांतीनगर व सिकंदर नगर भागाचा वीजपुरवठा तब्बल सात ते आठ तास खंडीत केला. वीजपुरवठा खंडीत (Power outage) करत संपुर्ण शहरास वेठीस धरण्याचा प्रकार घडल्याने शहरातील जनतेसह राजकीय पक्षांच्या (Political party) पदाधिकार्‍यांनी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

शिवीगाळ करणार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल झाला असतांना बेकायदेशीरपणे वीजपुरवठा खंडीत करणार्‍या वीज वितरणतर्फे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेसह शिवसेनेचे (shiv sena) खालीद शेख, आरपीआयचे (RPI) युवक तालुकाध्यक्ष गुरूकुमार निकाळे आदींनी केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कोतवाल नगरसह इतर भागात थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी लाईनमन निलेश मोरे गेले असता आमचे बिल जास्त आले आहे

त्यामुळे बिल दुरुस्त करून द्यावे तरच आम्ही बिल भरू असे थकीतदारानी सांगितले या कारणावरून लाईनमन मोरे आणि ग्राहकांमध्ये वाद होऊन मोहसीन मन्सूर आणि अफरोज शेख या दोन जणांनी मोरे यांना शिवीगाळ केली. मोरे यांनी पोलीस स्थानकात येवून दोघांविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भादवि 186, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.

दरम्यान, लाईनमनला शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती मिळताच मनमाडसह येवला आणि नांदगावच्या वीज कर्मचार्‍यांनी पोलीस स्थानकात धाव घेवून शिवीगाळ करणार्‍यांविरुद्ध 353 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र जर मारझोड झाली तर 353 आणि शिवीगाळ करण्यात आली तर 186 अन्वये गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचे पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. मात्र 353 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी लावून धरली.

मात्र पोलिसांनी तक्रारीनुसार योग्य कारवाई केल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी कोतवाल नगर, किर्ती नगर आणि सिकंदर नगर भागातील वीज पुरवठा खंडित केला तब्बल 7 ते 8 तास खंडित केला गेला. तसेच शहरातील वीज पुरवठा देखील सुमारे अर्धा तास खंडित करण्यात आला. ज्या भागातील वीज पुरवठा खंडित होता त्या भागात हॉस्पिटल तर आहेच शिवाय घरी उपचार घेत असलेले काही रुग्ण तर ऑक्सिजनवर देखील आहे मात्र असे असतांना देखील वीज कर्मचार्‍यांनी एक प्रकारे दंडेलशाही करून हजारो लोकांना वेठीस धरल्याचा आरोप शिवसेनेचे खालिद शेख व आरपीआयचे गुरुकुमार निकाळे यांनी केला आहे.

वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करणार्‍याचा समर्थन आम्ही करत नाही त्यांनी चूक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मग ज्यांनी बेकायदेशीरपणे तासनतास वीज पुरवठा खंडित करून जनतेला वेठीस धरले त्यांचा काय असा प्रश्न शेख व निकाळे यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com