शहर पोलीस आयुक्तालयाचा ‘रन अँड वॉक’ उपक्रम

शहर पोलीस आयुक्तालयाचा ‘रन अँड वॉक’  उपक्रम

नाशिक | प्रतिनीधी Nashik

शहर पोलीस आयुक्तालयाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त (32nd Anniversary of City Police Commissionerate)आज (दि.१९) शहरात पोलीस अधिकारी, अंमलदारांचे ‘रन अँड वॉक’ ( Run & Walk initiative)हा उपक्रम घेण्यात आला.

यानिमित्ताने पोलीस कवायत मैदानावर सकाळी ५ किमीच्या धावण्याच्या क्रीडा प्रकाराच्या अगोदर सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी वर्गाने झुम्बा नृत्य केले. त्यानंतर मैदानावरून धावण्याच्या शर्यतीला झेंडा दाखविण्यात आला.

याप्रसंगी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, पौर्णिमा चौगुले, प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त दिपाली खन्ना, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ आदी अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी सर्व उपस्थित अधिकारी, अंमलदारांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, पोलीस कवायत मैदानावर आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले होते. तसेच सेल्फीस्टॅन्डदेखील उभारण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com