
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
लोकसभेत अदानी (adani) प्रकरणावर विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. याविरोधात मार्चच्या पहिल्या आठवड्यात शहर काँग्रेसतर्फे (congress) रस्त्यावर उतरून
मोदी सरकार व अदानीच्या महाघोटाळ्याची सर्वसामान्यांना माहिती देण्यासाठी आंदोलन (agitation) केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष अँड. आकाश छाजेड (City President of Congress Akash Chhajed) यांनी दिली.
रायपूर (छत्तीसगड) येथे काँग्रेस अधिवेशनासाठी रवाना होण्यापूर्वी अँड. छाजेड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राहुल दिवे, माजी नगरसेविका वत्सला खैरे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, माजी नगरसेविका आशा तडवी, जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष अल्तमश शेख, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष किरण जाधव, प्रदेश युवक काँग्रेस सरचिणीस नितीन काकड आदी उपस्थित होते. छाजेड म्हणाले, कोविडचे (corona) संकट असो वा अदानी ग्रूपवर (Adani Group) केली जाणारी नियमबाह्य मेहेरनजर, याबाबत काँग्रेसचे नेते राहूल गांधी (rahul gandhi) यांनी पूर्व कल्पना दिली होती. मात्र, याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याने देशाचे मोठे नुकसान झाले.
केंद सरकारवर आरोप
अदानी यांच्या कंपन्यामधील शेअर्स २४ जानेवारीपासून हिंडेनबर्ग रिससर्चच्या (Hindenburg Research) गंभीर अहवालापासून खाली घसरले आहेत. समूह संचयी बाजार नोटा आता ११० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. त्यामुळे व्यापक आर्थिक संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांनी मागील आठवड्यात या घटनेची चौकशी करण्यासाठी संसदीय पॅनलची मागणी केली.
राज्यसमर्थीत आयर्विमाँ महामंडळ (Air Insurance Corporation), एलआयसी (LIC) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) यांनी अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकीबद्दलही काँग्रेसने संताप व्यक्त केल्याचे छाजेड म्हणाले. सामान्य माणसाने आपला पैसा एका व्यवसायिकाच्या गौतम अदानी कंपनीत (Gautam Adani Company) गुंतविला आहे. सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकार सामान्य माणसाला नाही तर एका व्यावसायिकाला पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले.
एलआयसीची अदानी फर्ममध्ये ४.२३ टक्के इतकी भागीदारी आहे तर तिच्या इतर एक्सपोजर मध्ये अदानी पोर्टर मधील ९.१४ आणि अदानी टोटल गॅस मध्ये ५.९६ टक्के हिस्सा आहे. हा देश या सगळ्या धोरणामुळे आर्थिक अधोगतीला जात आहे,अशी भीती या आधी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी (rahulgandhi) यांनी आधीच व्यक्त केली होती. तेव्हा भाजप सरकारने जाणून-बुजून कानाडोळा केल्याचे ॲड. छाजेड यांनी नमूद केले.
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेच्या अहवालाने अदानी उद्योग समूहातील महा घोटाळा उघड झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार हे अदानी समूहाला सहकार्य करत आहे, हे दिसून येत आहे. देशातील सर्वसामान्य जनतेने एलआयसी व एसबीआय मध्ये ठेवलेल्या कष्टाचा पैसा मोदी सरकारने अदानी समूहात बेकायदेशीरपणे गुंतविला आहे. यामुळे देशातील गोरगरीब मध्यमवर्गीय जनतेची करोड रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
काँग्रेस पक्ष हा मुद्दा संसद, प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि जनतेसमोर अशा सर्वच स्तरावर मांडत आहे. काँग्रेस पक्षाने दि. १७ फेब्रुवारी रोजी देशभरातील २३ शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन मोदी सरकार व अदानीच्या महाघोटाळ्याची पोलखोल केली आहे. अदानी यांच्या या कथित घोटाळ्यासंदर्भात भाजप सरकार त्यांच्या पाठीशी असल्यामुळे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत व रस्त्यावर उतरून आंदोलने केली.
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने करण्यात आली.आता लवकरच नाशिक शहर काँग्रेसच्यावतीने शहर तसेच ब्लॉक स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शहर काँग्रेसच्या आघाड्या व विभागाचे सर्व पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, असे शहराध्यक्ष छाजेड यांनी सांगितले.
अदानीकडे आता 'समृद्धी' ही जाणार ?
पोर्ट, एअरपोर्ट, धारावी यासह विविध सरकारी उपक्रम अदानी उद्योगाला दिल्यानंतर आता राज्यातील समृद्धी महामार्ग, रेल्वे फलाट तसेच सायन कोळीवाडासारखा मुंबईतील महत्त्वाचा परिसर अदानी उद्योगाला दिला जाणार असल्याचा आरोप अँड. आकाश छाजेड यांनी केला. सरकारची अदानी समूहावर एवढी मेहेरबानी का, असा सवाल करत मोदी सरकार व अदानी समूह यांच्यातील साटंलोटं जनतेसमोर आणण्यासाठी मार्च महिन्यात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.