राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शहर काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शहर काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. असा आरोप करत याचा विरोध करण्यासाठी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी (दि.२३ ) कॉंग्रेस भवनसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनाचा पुढील भाग म्हणून पदाधिकारी जेलभरो आंदोलन करतील, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले...

खासदार राहुल गांधी यांना सुरत कोर्टात जामीन मंजूर केला. परंतु, या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम मोदी सरकार करत आहे. देशात एकमेव राहुल गांधी असे नेते आहे जे मोदी सरकार विरोधात आवाज उठवत आहेत.

त्यांनी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा काढली त्याला घाबरून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. याचा विरोध करण्यासाठी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी निदर्शने करण्यात आली.

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शहर काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने
भाजपशी पुन्हा युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

या प्रसंगी नाशिक शहराध्यक्ष आकाश छाजेड, अल्पसंख्यानक शहर अध्यक्ष हनिफ बशीर, सेवादलाचे शहर अध्यक्ष वसंत ठाकूर, नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेविका आशा तडवी, महिला शहर अध्यक्ष स्वाती जाधव, एनएसयुआय चे शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमश शेख, ओबीसी शहर अध्यक्ष गौरव सोनार,सचिव फारूक मन्सूरी, जावेद इब्राहिम,जुली डिसोझा,अनिल बहोत, कुसुम चव्हाण,समीना पठाण, गुडी आपा खान, साजिया शेख,अरुणा आहेर, सारिका कीर, महेरुणीसा शेख,जावेद मिर्झा, सागर वाहूळ, दाऊद अब्दुल गाणी शेख, दाऊद शेख, राजेंद्र हिवाडे, ज्ञानेश्वर काळे, इसाक कुरेशी, फारूक कुरेशी, सादिक मन्सुरी आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शहर काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने
अदानींना जोर का झटका देणाऱ्या 'हिंडेनबर्ग'चा नवा अहवाल येणार, उद्योग विश्वात मोठी खळबळ

...सगळ्यांनाच शिक्षा व्हायला हवी

न्यायालयाने ज्या कारणासाठी राहूल गांधी यांना शिक्षा सुनावली ते कारण ग्राह्य मानले. तर दर क्षणाला एकमेकांचा उद्धार करणारे राजकीय नेते आणि त्यांना वेगवेगळ्या उपाध्या देऊन बोलणाऱ्यांना सगळ्यांनाच शिक्षा व्हायला हवी,अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com