सिटी सेंटर मॉल ते गोविद नगर रस्त्यावर गतिरोधक उभारावे : चुभळे

सिटी सेंटर मॉल ते गोविद नगर रस्त्यावर गतिरोधक उभारावे : चुभळे

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिटी सेंटर मॉल (City Center Mall) ते गोविद नगर (Govind Nagar) बोगदा या रस्त्यावर सतत अपघात (accident) होत आहेत.

तरी या रस्त्यावर गतिरोधक (speed breaker) उभारावे तसेच आरडी सर्कल जवळ सिग्नल (signal) उभारावे या मागणीचे निवेदन (memorandum) पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी (Deputy Commissioner of Police Pournima Chaugule Shringi) व नासिक म.न.पा .कार्यकारी अभियंता रौंदळ यांना सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की नवीन नाशकातील (navin nashik) प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंद नगर परिसरातील सिटीसेटंर मॉल ते गोविंद नगर च्या बोगद्या पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते . या रस्त्यावर ट्राफिकचा (Traffic) प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या शंभर फुटी रोडला गतिरोधक व सिग्नलची अत्यंत गरज आहे. असा एकही दिवस नाही की या रोडला अपघात घडत नाही.

या परिसरामध्ये हॉस्पिटल, क्लासेस , शाळा,दुकानदार, मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना, महिला वर्गाला रस्ता क्रॉस करतानी जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करावा लागत आहे. तरी या रस्त्यावर मुख्य चौक ठिकाणी गतिरोधक उभारावे तसेच नेहमी वर्दळ असणारे आरडी सर्कल येथे सिग्नल उभारावे अशी मागणी कैलास चुंभळे,नानासाहेब जगताप, समाधान गोडसे ,मारुती फड,अशोक गुळवे आदी नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com