घोटी
घोटी
नाशिक

घोटी, गोंदे येथे सीटुचे मानवी साखळी आंदोलन

विविध मागण्यांसाठी

Gokul Pawar

Gokul Pawar

घोटी | Ghoti

केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी, व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात सातत्याने धोरण अवलंबले असल्याच्या विरोधात कामगार कर्मचारी कृती समीतीच्या निर्णयानुसार आज मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील इगतपुरी, गोंदे फाटा व घोटी टोलनाका येथे सीटु व किसानसभेच्या नेतृत्वाखाली कामगार, शेतक-यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध, निदर्शने करुन मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात करोना काळात सामान्य कुटुंबांना मोफत धान्य मिळावे, आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना आर्थिक सहायय मिळावे, वेतन कपात व कामगार कपातीवर बंदी आणावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, आदिवासी भागात वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी व्हावी, शेतमालाला हमीभाव मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनाचे नेतृत्व सीटुचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळेसह पदाधिकारी, कामगार, मजूर शेतकरी, आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com