रेल्वे खाजगीकरणाच्या विरोधात सीटूचे आंदोलन
नाशिक

रेल्वे खाजगीकरणाच्या विरोधात सीटूचे आंदोलन

रेल्वे स्टेशन प्रबंधक प्रेमचंद्र आर्या यांना निवेदन

Abhay Puntambekar

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रासह रेल्वेचे खाजगीकरण करण्यास सुरुवात केली असुन देशात १०९ मार्गावर चालणाऱ्या १५१ रेल्वे गाड्ंयाचे खाजगीकरण करण्यास केंद्र शासनाने सुरुवात केली आहे. सर्वसामान्य जनतेला असे सांगितले जाते की, खाजगीकरण केलेल्या गाडीमुळे कमी वेळेत व कमी पैशात प्रवास करता येइल. परंतु तसे न होता खाजगी रेल्वे गाडीला २८०० रुपये व सरकारी गाडीला १२०० ते १४०० रुपये भाडे लागेल. खाजगी रेल्वे गाडी लखनौ ते दिल्लीतील तीन नंबर प्लॉटफार्मवर थांबेल. तर सरकारी गाडी पाच नंबर प्लॉटफार्मवर थांबेल.

खाजगीकरण केल्याने ३० हजार कोटी रुपायांची गुंतवणूक होइल व देशाचा विकास होइल असे सांगितले जाते. मात्र तसे पाहीले तर खाजगी क्षेत्र काहीच गुंतवणूक करीत नसुन आपल्या देशातील विविध बँकेतुन मोठी कर्ज घेतली जातात. आणि सरकारी मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून कवडीमोल किमतीत लुटली जाते. त्यानंतर काही दिवस हे उद्योग चालवतात व नंतर हे उद्योग बंद पडतात. तसेच तोट्यात किंवा अडचणीत येतात त्यामुळे कर्ज देणा-या बँका अडचणीत आल्याचा अनुभव आहे. म्हणून सरकारने खाजगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक क्षेत्राची भांडवलदारांकडुन चालवलेली लुट बंद करुन रेल्वेचे खाजगीकरण रद्द करावे, रिक्त पदे न भरणारा आदेश रद्द करावा असे निवेदनात म्हटले आहे.

दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता इगतपुरी रेल्वे तिकीट बुकींग कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करून सीटू संघटनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन प्रबंधक प्रेमचंद्र आर्या यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी सीटुचे जिल्हा सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे, कांतिलाल गरुड, चंद्रकांत लाखे, दता राक्षे, मच्छिंद्र गतीर, हेमंत तोकडे, विश्वास दुभाषे, रामदास चारसकर, गोकुळ गोवर्धने, संध्या जोशी, जाईबाई घाटाळ, प्रभाकर नाठे, निवृत्ती कडु, सदानंद शेळके, रेल्वे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, रेल्वेच्या गोपनीय विभागाचे दुर्गेश बाघेल व रामकुमार यादव, रेल्वे सुरक्षा बल निरिक्षक एस. बर्वे, इगतपुरी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, गोपनीय विभागाचे विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले यासह कामगार व शेतकरी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com