अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सीटूचा पाठींबा  

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सीटूचा पाठींबा  
CITUअंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सीटूचा पाठींबा  

सातपूर I Satpur (प्रतिनिधी)

अंगणवाडी, आशा, शालेय पोषण कामगार, राष्ट्रीय आरोग्य मिशन इ. योजना कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सीटू या कामगार संघटनेद्वारे पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. .

केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात देशातील अंगणवाडी, आशा, शालेय पोषण, राष्ट्रीय आरोग्य मिशन अशा केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांचा ७ आगस्ट रोजी संप होत आहे.

या संपास महाराष्ट्र सीटूने पाठिंबा व्यक्त केला आहे .मोदी सरकारने योजना कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अशीही मागणी सीटूने केली आहे.

केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, जनविरोधी धोरणांच्या विरोधात दि.7 व 8 ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या योजना कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप व 9 ऑगस्ट रोजी सर्व कामगार, शेतकरी, कष्टकऱ्यांचे जेलभरो आंदोलन पुकारले आहे.

परंतु महाराष्ट्रात या संघटनां लॉक डाऊन व वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत आपल्या केंद्रीय व राज्य स्तरीय मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी व तीव्र होत असलेल्या तातडीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दि.7 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करीत असल्याचे सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष डॉ डी एल कराड व सरचिटणीस एम एच शेख यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com