तहसील कार्यालयासमोर समोर सीटूची निदर्शने

तहसील कार्यालयासमोर समोर सीटूची निदर्शने

सिन्नर । वार्ताहर Sinnar

कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीटूच्यावतीने (CITU ) तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे ( Tehsildar Rahul Kotade ) यांना देण्यात आले.

करोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर कंपनीतील कामगारांना काही दिवस घरीच बसावे लागले.

लॉकडाऊनच्या काळातील वेतन कामगारांना मिळावे, कोरोना महामारीच्या आजारामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मिळावे, सर्व कामगार- कर्मचारी यांचा 50 लाखांचा विमा काढावा व त्याचा हप्ता केंद्र, राज्य सरकार व कंपनी व्यवस्थापनाने भरावा, कंपनी आवारात मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करावी,

बांधकाम- घरेलू कामगारांना नोंदणी करून मंडळाचा लाभ द्यावा, रेशनकार्डधारकांत भेदभाव न करता सर्वांना मोफत धान्य द्यावे, तालुक्यातील उद्योगांमध्ये 80 टक्के स्थानिक कामगारांची भरती करावी, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्यावे, सिन्नर येथे ईएसआयसी हॉस्पिटल सुरू करावे, मे. केबल कॉर्पोरेशन कामगारांचे महिन्यांचे थकीत वेतन त्वरित द्यावे,

विडी कामगारांना किमान वेतन द्यावे, केटा फार्मामधील बाहेर ठेवलेल्या कामगारांना त्वरित कामावर घ्यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्याआहेत.

यावेळी सीटूचे तालुकाप्रमुख हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी, रामदास सांगळे, प्रवीण झगडे, सतीश डोमाडे, राजकुमार उगले, दत्तात्रय रसाळ यांच्यासह कामगार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com