तीस वर्षानंतर मिळणार नागरिकांना पाणी

नगरसेवकांच्या प्रयत्नांला यश
तीस वर्षानंतर मिळणार नागरिकांना पाणी
पाणी पुरवठा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सुमारे तीस वर्षांपूर्वी महानगरपालिकेत (Municipal Corporation) गावाचा समावेश होऊन देखील सातपूर-त्रंबकेश्वर रस्त्यालगत (Satpur-Trumbakeshwar road) असलेल्या पिंपळगाव बहुला (Pimpalgaon Bahula) मळे विभागातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून (Drinking water) वंचित होते.

आज प्रभागाच्या नगरसेवकांच्या प्रयत्नाने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन (Drinking water pipeline) टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून, येथील नागरिकांना तीस वर्षांनंतर का होईना पिण्याचे पाणी मिळणार असल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी सन 1992 मध्ये नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) ही स्वायत्त संस्था अस्तित्वात आली. यावेळी शहरालगत असलेले खेडोपाडीचे गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले होते.

यात महानगरपालिकेची शेवटची हद्द असलेले पिंपळगाव बहुला या गावाचाही समावेश करण्यात आला होता. वीज (electricity), पाणी (water) रस्ता (road) या मूलभूत सुविधा देणे क्रमप्राप्त असतांना मात्र मनपाच्या वतीने हे गाव दुर्लक्षितच राहिले होते. मळे विभागातील नागरिक आजही पिण्यासाठी विहिरीतील पाण्याचा वापर करत आहे. दरम्यान, प्रभागाच्या नगरसेवकांनी सातत्याने पाठपुरावा करत पिंपळगाव बहुला मळे विभागातील नागरिकांसाठी 30 लक्ष रुपयांची पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आ.सिमा हिरे (mla seema hirey), भाजपा (bjp) शहराध्यक्ष गिरीष पालवे (girish palve), महिला शराध्यक्ष हिमगौरी आडके, भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस विक्रम नागरे, सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, नगरसेविका इंदूमती नागरे, माधुरी बोलकर, रामहरी संभेराव, अमोल ईघे, भगवान काकड, चारुदत्त आहेर, गणेश बोलकर, गौरव बोडके, विश्वास नागरे, जितू ओगले, रवींद्र पालवे, आशिष सुराशे, सार्थक नागरे आदिसह पिंपळगाव बहुला नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com