जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांची वणवण

दिवसभरात 16 केंद्रावर केवळ 816 जणांना लस
जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांची वणवण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात करोना प्रतिबंधक लसीचा मोठा तुटवडा असून आज दिवसभरात संपुर्ण जिल्ह्यात 225 पैकी केवळ 16 केंद्रांवर दोन्ही मिळून केवळ 816 जणांनाचेच लसीकरण करण्यात आले. लसींचा रविवारी पुरवठा होणार असल्याने सोमवारपासून लसीकरण पुर्ववत सुरू होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात एकीकडे कडे कोरोना अटोक्यात येत असतानाच दुसरीकडे लसीकरणासाठी करोना प्रतिबंधक लसच उपलब्ध होत नसल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. जो साठा जिल्ह्याला उपलब्ध होत आहे. त्यामध्ये दुसर्‍या डोसला प्राधान्य देण्यात आले असून 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण पुर्णत बंद आहे. असे असतानाही पहिला डोस अल्प तर दुसरा डोसही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. यामुळे संपुर्ण जिल्ह्यात लसीकरण कासवगतीने सुरू आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 8 लाख 86 हजार 881 जणांना लस देण्यात आली. दरम्यान कोव्हॅक्सीन हे केवळ 45 वर्षांवरील दुसरा डोस बाकी असणाऱ्यांना देण्यास सुरूवात झाल्याने ते इतरांना नाकारण्यात आले आहे.

शहर तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 86 हजार 881 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने पुन्हा एकदा लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान शनिवारी दिवसभरात दोन्ही मिळून केवळ 816 जणांना लस देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली महिनाभरापासून जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने जिल्ह्यातील 225 पैकी 209 लसीकरण केंद्र बंद होती.

नाशिक महापालिकेच्या 1 तर जिल्हाभरातील 15 अशा एकुण 16 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात 279 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 5, ग्रामिण जिल्ह्यात 130, मालेगाव 23 असे लसीकरण झाले आहे. तर 537 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com