नागरिकांनी नियमांचे पालन करावे

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन
नागरिकांनी नियमांचे पालन करावे

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

सिन्नर (sinnar), येवला (yeola) व निफाड तालुक्यात (niphad taluka) रूग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. सध्याचा काळ हा सण, उत्सवांचा (festival season) आहे.

त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्क (mask), सॅनिटायझर (sanitizer) व सामाजिक अंतर (social differences) या त्रिसूत्रीचे पालन कटाक्षाने करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले आहे

लासलगाव (Lasalgaon) येथील ग्रामीण रूग्णालयाच्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या (Oxygen Generation Plant) उद्घाटन (Inauguration) प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच जयदत्त होळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिष सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळकृष्ण अहिरे आदींसह रूग्णालयातील आरोग्य सेवक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, करोना (coaona) अद्याप संपलेला नाही. आगामी तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा ऑक्सिजनच्या (oxygen) बाबतीत सक्षम झाला आहे. आज येथील ऑक्सिजन प्लांटच्या व्यवस्थेमुळे करोना शिवाय इतर आजाराच्या रूग्णांनाही ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या प्लांटची क्षमता 20 एन.एम. क्युब इतकी असून 340 लिटर प्रती मिनिट ऑक्सिजन या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

याशिवाय लिक्विड ऑक्सिजनचे (liquid oxygen) जंबो सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (oxygen concentrator) व ड्युरा सिंलेंडर्सचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. याप्रसंगी हरिश्चंद्र भवर, शिवा सुराशे, गुणवंत होळकर, विजय सदाफळ, डॉ. गुंजाळ, डॉ. कांगणे, डॉ. चांदर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.