दिंडोरी तालुक्यात लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद

मोहाडी प्रा.आ. केंद्रात १९३९ लसीकरण
दिंडोरी तालुक्यात लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद

जानोरी | संदिप गुंजाळ Janori

दिंडोरी तालुक्यात Dindori Taluka कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे Vaccination काम प्रगतीपथावर सुरु असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. एकाच दिवशी १३७८८ लसीकरण करून दिंडोरी तालुक्याने आदर्श निर्माण केला असून त्यात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राने एक दिवशी १९३९ लसीकरण करून तालुक्यात विक्रम केला असून सर्व स्तरातून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे व आरोग्य विभागीय अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

करोना पासून बचाव करावयाचा असेल तर लसीकरण हे एकमेव पर्याय दिसत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागापुढे एक आव्हाहनच होते सुरुवातील लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पाठफिरवली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाचे महत्व नागरिकांना समजल्याने लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाने दिंडोरी तालुक्यातून १३७८८ लसीकरणाचा यशस्वी टप्पा गाठल्याने तालुक्यातून आरोग्य विभागाचे अभिनद होत आहे त्यात मोहाडी आरोग्य केंद्र – १९३९, कोचरगाव-९६२, निगडोळ-६३०, ननाशी-१०५९, पांडणे-१७८६, तळेगाव दिंडोरी-१८००, उमराळे-१४०८, वरखेडा-१२८४, वारे-९९८, खेडगाव-१५९६ तसेच ग्रामीण रुग्णालय दिंडोरी-२००, ग्रामीण रुग्णालय वणी-१५५ असे एकूण १३७८८ लसीकरण करण्यात आले आहे आत्तापर्यंत २,३६,७८२ पैकी पहिला डोस-११६३१० (४९%), दुसरा डोस-३४६६९ (१५%) एकूण लोक्संखेनुसार ६३.८% इतक्या टक्केवारीने काम झाले असून १,५०,९७९ इतके नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे .

यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य समुदाय अधिकारी, उपकेंद्र येथील सर्व आरोग्य सेवक-सेविका, आशा गटप्रवर्तक, आशा कार्यकर्ती आदि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेत आहेत.

करोनापासून बचाव करायचा असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने कोणताही गैरसमज मनात न ठेवता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी विशेष परिश्रम घेत असून तालुक्यातील त्यांच्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून एक आदर्श निर्माण करू व आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून दिंडोरी तालुका कायमस्वरूपी कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे मी तालुक्यातील नागरिकांना आव्हाहन करतो.

-डॉ. सुभाष मांडगे , तालुका आरोग्य अधिकारी, दिंडोरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com