मटाने येथे कोविड लसीकरनास नागरिकांचा प्रतिसाद

मटाने येथे कोविड लसीकरनास नागरिकांचा प्रतिसाद

मटाने l Matane (वार्ताहर)

देवळा तालुक्यातील मटाने येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचा कोविड प्रतिबंध लसीकरनास उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद शाळा मटाने याठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली (दि. १२) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मटाने येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सरपंच भाऊसाहेब आहेर, प्रा. आ. केंद्र खर्डे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सपकाळे व डॉ. जाणकार, ग्रामसेवक अनिल आहेर, समुदाय आरोग्य अधिकारी तीलुत्तमा देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्स नियमांचे पालन केले. प्रथम लसीकरण शकुंतला कानडे यांना करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य समाधान केदारे, रवींद्र केदारे, जनार्दन पाटील, आरोग्य सेविका एस एन भामरे, आरोग्य सेवक शिवाजी सोनवणे, आशा सुरेखा आहेर, वंदना पवार, प्रमिला पवार, अंगणवाडी सेविका कमल आहेर, संगीता पाटील, योगिता साबळे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com