विनापरवानगी सुरू होणाऱ्या करोना सेंटरला नागरिकांचा विरोध

विनापरवानगी सुरू होणाऱ्या करोना सेंटरला नागरिकांचा विरोध

नवीन नाशिक | Nashik

अश्विन नगर येथील खासगी बंगल्यात भर नागरी वस्तीत विनापरवाना कोविड सेंटर उभारले जात असल्याने येथील नागरिकांनी त्याला विरोध दर्शवित सुरू असलेले काम बंद पाडले.

आश्विन नगर येथे खाजगी बंगला ए एस सी 22 या ठिकाणी खासगी कोविड सेंटर साठी भाड्याने दिले आहे. हा बंगला रहिवासी क्षेत्र असताना त्याचा व्यवसायिक वापर होतो आहे. कोविड सेंटर उभारण्यासाठी येथे पार्किंग व्यवस्था नाही. रुग्णवाहिका शिवाय नातेवाईकांना थांबण्यास जागा नाही. शिवाय येथे नागरी वस्ती असतानाही शासनाचे नियम धाब्यावर बसवत काम सुरू करण्यात आले होते.

येथील प्रभाग क्र.२७ च्या नगरसेविका किरण दराडे यांना या ठिकाणी बोलवत हे काम बंद पाडले. नगरसेविका दराडे यांनी मालक चौधरी याची चांगलीच कानउघाडणी केली. हा प्रकार अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांना समजताच त्यांनी नागरिकांशी समजूत काढून कायदेशीर तक्रारी करण्याचे सांगितले.

परिसरातील नागरिक चंद्रशेखर गुप्ता, जयप्रकाश नागर, नितीन आहिरे, विशाल देशमुख, चारुदत्त कापसे, नरेंद्र पाटील, विवेक राणे, प्रशांत भोळे, संजय देवरे, प्रवीण काटकर, सुनीत भारांबे, गणेश वराडे, यशवंत चव्हाण यांनी कोविड सेंटरला विरोध दर्शवला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com