महावितरणचा मनमानी कारभार; वीजेच्या लपंडावाने 'या' भागातील नागरिक त्रस्त

महावितरणचा मनमानी कारभार; वीजेच्या लपंडावाने 'या' भागातील नागरिक त्रस्त

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

एकीकडे अव्वाच्या सव्वा वीज बिले (Electricity bills) येत असताना, दुसरीकडे विद्युत मंडळाच्या (MSEDCL) मनमानी कारभाराचा अनुभव नागरिक घेत आहेत. वीज पुरवठा (Power supply) कधीही येतो आणि कधीही खंडित होतो. याबाबत येथील अधिकाऱ्यांचे कुठलेच नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नवीन नाशिक (navin nashik), अंबड (Ambad), पाथर्डी फाटा (pathardi phata) या संपूर्ण भागात विजेचा भोंगळ कारभार सुरू आहे. या भागात भार नियमन कधी असते? याची माहिती नागरिकांना मिळत नाही. तर वीज कधीही खंडित होते आणि कधीही येते याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

येथील विद्युत मंडळ अधिकारी अथवा कर्मचारी यांना वीज (Electricity) कधी येणार? याबाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडे उत्तरे नसतात. तर अनेक वेळा हे कर्मचारी व अधिकारी नागरिकांचे फोनच उचलत नसल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कुणाचेही बिल कुणाला

पाथर्डी फाटा भागात वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेगळाच अनुभव नागरिक घेत आहेत. कुणाचेही बिल कुणालाही दिले जात आहे. योग्य पत्ता न पाहता वाटेल तिथे वीज बिले टाकून दिली जात असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

अंबड भागात विजेचा खेळखंडोबा- आमच्याकडे अंबड, महालक्ष्मी नगर परिसरात वीज कधीही जाते आणि कधीही येते. याबाबत येथील अधिकाऱ्यांची वारंवार संपर्क साधला तरी कोणतीही माहिती मिळत नाही. अखंड वीज पुरवठा सुरू रहावा.

- दीपक दातीर, शिवसेना ठाकरे गट माजी नगरसेवक

बिल्डर साठी वीज बंद करतात - आमच्याकडे अंबड, मोरे मळा भागात विद्युत कर्मचारी हे बांधकाम व्यवसायिकांसाठी वारंवार वीज बंद करतात. याचा त्रास इतर नागरिकांना सहन करावा लागतो. हा वीज पुरवठा पाच - सहा तास खंडित करतात.

- सचिन महाजन, नागरिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com