मल्हारखानच्या नागरिकांना मिळणार न्याय

मल्हारखानच्या नागरिकांना मिळणार न्याय

नाशिक | प्रतिनिधी | Mumbai

मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून नाशिकच्या मल्हारखाण (Malhar Khan) जागेबाबत चर्चा उपस्थित केली. ती शासकीय जागा असताना या जागेला वारस लावले गेले, या जागेची विक्री करण्यात आली, विक्रीची नोंद शासकीय दप्तरात आहे, यामुळे ही जागा शासनाने जमा करून त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सर्वांसाठी घरे या धोरणानुसार हक्काची घरे देण्यात यावी, अशी मागणी  केली.

शंभर वर्षांपासून शासनाची जमीन खाजगी व्यक्तीच्या नावे झालेल्या असताना महसूल विभाग (Department of Revenue) मात्र बघ्याची भूमिका घेत होता. याबाबत खंत व्यक्त करताना आपल्याला याबाबत कारवाई नको शंभर वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना न्याय द्या, अशी मागणी आ. फरांदे यांनी केली.

 याबाबत उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) भूमापन क्रमांक 670 /आ जागा विजेचे पावर हाऊस करता भागवत यांना दिल्याचे दिसून येते. या जागेची विक्री व वारस लागल्याचेही दिसून येते.

मल्हारखानच्या नागरिकांना मिळणार न्याय
समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग आधी ही बातमी वाचा

त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत शर्तभंग झाल्याचे दिसत असून सर्वे नंबर 670/ब ही जागा शंकर पांडू भिल व इतर यांना देण्यात आलेली होती. कोणतीही विक्रीची पूर्व परवानगी न घेता या जागा विक्री झाल्याचे व  शर्तबंग झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही जागा शासन जमा करण्यात येतील असे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या ठिकाणी सर्वांसाठी घरे या धोरणानुसार घरकुलासाठी जागा उपलब्ध करून तेथे राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे देण्यासाठी कारवाई करण्यात येईल का, असा प्रश्न आ. देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला असता असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील जागा घरकुलासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com