जुने नाशिक
जुने नाशिक
नाशिक

बंद मार्ग खुला करण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

समाधान व्यक्त

Gokul Pawar

Gokul Pawar

जुने नाशिक | Old Nashik

करोना पार्श्वभूमीवर जुना नाशिक परिसर बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता मुदत संपल्यानंतर नागरीकांनी आंदोलन करीत बंद मार्ग खुला केला आहे.

दरम्यान जुन्या नाशिक परिसरात रुग्ण संख्या कमी असताना देखील पोलिसांच्या पुढाकाराने येथील जवळपास सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. सहा दिवसांची मुदत देण्यात आली होती ती संपली तरी मार्ग मोकळे करण्यात आले नव्हते. म्हणून आज सकाळी फाळके रोड परिसरातील बंद मार्ग उघडण्यासाठी नागरिक तसेच लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा मार्ग खुला केला.

पोलीस बंदोबस्तात झालेल्या या आंदोलनात शेकडो नागरिकांनी भाग घेतला हे आंदोलनानंतर मार्ग खुले झाले. यामुळे नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com