पोल्ट्री फार्म बंद व्हावा म्हणून नागरिकांचे उपोषण

पोल्ट्री फार्म बंद व्हावा म्हणून नागरिकांचे उपोषण

नांदगाव | Nandgoan

तालुक्यातील अमोदे येथील गावालगत असलेल्या जागेत अण्णासाहेब पगार यांनी पोल्ट्री फार्म चालू केलेला आहे.

यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि नागरिक यांना त्रास होत असल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार नांदगाव प्रशासनाकडे केली आहे. ग्रामपंचायतने तात्काळ कारवाई न केल्याने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आमोदे येथील नागरिकांनी प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला सुरुवात केली आहे.

आमोदे गावालगत असलेल्या जागेत आण्णा पगार यांचा पोल्ट्री फार्म आहे. ही पोल्ट्री गावाजवळ असल्याने या परिसरातील नागरिकांना व लहान मुलांना त्यामुळे त्रास होत आहे

या पोल्ट्री मुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्य धोक्यात आल्याची लेखी तक्रार येथील काही नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केली आहे. हा पोल्ट्री व्यवसाय बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. संबंधित यंत्रणेने जोपर्यंत सदर पोल्ट्री फार्म बंद करण्याचे लेखी आदेश देत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार केला असून उपोषणकर्त्यांची जीवितास काही झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर असेल असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर धनराज सोनवणे, दिनेश पगार, ज्ञानेश्वर सोनवणे, गुलाब सोनवणे, दिनेश खैरनार, दादाजी सोनवणे, गुलाब सोनवणे, बारकू पगार, दिनेश खैरनार, बापू माळी, शांताराम पगार, सोमनाथ कोल्हे, रमेश दळवी, गणेश सोनवणे, अशोक सोनवणे, दतु पगार, अशोक सूर्यवंशी, बंडू पगार, विठ्ठल पगार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com