सार्वजनिक बांधकाम विभागावर नागरिकांचा भरवसा नाय ?

हरसूल, करंजाळी परिसरातील दयनिय अवस्था
सार्वजनिक बांधकाम विभागावर नागरिकांचा भरवसा नाय ?

हरसूल । वार्ताहर | Harsul

हरसूल (harsul) - नाशिक (nashik) महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे (potholes) पडले असून हा महामार्ग वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.सा. बां.विभागाने काही भागात बुजविलेले खड्डे पुन्हा पावसाच्या जोरदार हजेरीने डोके वर काढत असल्याने जणू खड्यांचे राजकारण (politics) बघावयास मिळत आहे.

असून अडचण नसून खोळंबा ठरत असलेल्या हरसूल - नाशिक महामार्गावर (Harsul - Nashik highway) खड्डे पडले गोल गोल ; वाहनधारकांचा जातोय तोल! अशी म्हणायची वेळ आली आहे. यामुळे हरसूलकरांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर (Public Works Department) भरवसा नाय काय? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटली जात आहे. नाशिकला (nashik) जोडणारा हरसूल - नाशिक दळणवळणाच्या दृष्टीने अति महत्वाचा महामार्ग आहे.

अवजड वाहनांसाठी सोपस्कर ठरत आहे.या महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. मात्र काही ठिकाणी या महामार्गाची दयनीय दुरवस्था झाली आहे. त्यात दुगाव फाटा ते गिरणारे (girnare), गिरणारे ते धोंडेगाव, देवरगाव ते सापते, हरसूल ते ठाणापाडा आदी ठिकाणी अनेक खड्डे (potholes) पडले आहेत. हरसूल ते ठाणपाडा (thanpada) परिसरातील महामार्गावर अनेक ठिकाणी लहान मोठ्या खड्यांनी तर अधिराज्य गाजविले आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

या भागात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) काही दिवसांपूर्वी धातूर मातूर पद्धतीने खड्डे (potholes) बुजविण्यात आले होते, मात्र पावसाच्या जोरदार हजेरीत बुजविलेल्या खडड्यांचे पितळ उघडे पडले आहे. महामार्गावर गोल - गोल पडलेल्या खड्यांमुळे खड्डा चुकवितांना लहान मोठ्या अपघातास सामोरे जाण्याची वेळ येत आहे. शारीरिक व्याधींसह वाहनांच्या बिघाडीचा फटका सहन करावा लागत आहे.

या पडलेल्या खड्यामुळे महामार्ग की रस्ता असा दुहेरी पेच निर्माण झाला आहे. त्यातच अनेक ठिकाणी पावसाचे पाणी खड्यात साचले असल्याने खड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे वाहन जोरात आपटत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कुठलेही सोयसुतक पडलेले दिसत नाही. दिवसेंदिवस महामार्गात खड्यांची मालिका सुरू असून वाहनधारकांना डोकेदुखीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) तात्काळ महामार्गाची झालेली दुरवस्था थांबवून दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पेठ । वार्ताहर

पेठ (peth), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) व तालुक्याला जोडणार्‍या करंजाळी हरसुल रस्त्याची मोठी दुरवस्था (Bad condition of road) झाली आहे. या रस्त्यावरील ससूने ते आमलोन दरम्यानचा रस्ता पूर्ण खड्ड्यात गेल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. करंजाळी - हरसुलची वाट बिकट झाल्याने तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याच रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. या रस्त्यावरील साबाई देवी, घनशेत, कुळवंडी, ससुने, अमलोन रस्त्यावर लहान मोठे खड्ड्यांनी साम्राज्य निर्माण केले आहे. सध्याच्या स्थिती पावसामुळे भरलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात सामोरे जावे लागत असून लहान मोठे अपघात घडत असल्याने व रस्त्या जीवघेणा ठरत आहे. याच रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना अनेक व्याधी जडत असून त्याचे दुखणे वाढत आहे.

कोळवंडी कोवर करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्र तर हरसुल सारखे ग्रामीण रुग्णालयात आरोग्यासाठी व दळणवळणासाठी याच मुख्य रस्त्याचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो आहे. आरोग्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वेळ आणि दुखणे सहन करावी लागत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com