मुलीची छेड काढणाऱ्यास नागरिकांनी दिला चोप

मुलीची छेड काढणाऱ्यास नागरिकांनी दिला चोप

इंदिरानगर | वार्ताहर | Nashik

शुक्रवार दि 18 रोजी शाळा (school) सुटल्यानंतर आपल्या घरी जाणाऱ्या शाळकरी मुलींना पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील एक्सप्रेस इन हॉटेल जवळ रस्त्याला लागून असलेल्या ठिकाणी एका टवाळखोर युवकाने रस्त्यात मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

दोघी मुली घाबरल्या घाबरलेल्या अवस्थेत एक मुलीने आपले घर घाठले व आई वडिलांना सविस्तर माहिती सांगितली. मुलीचे आई-वडील लगेच घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी छेड काढत असलेल्या युवकाला त्यांनी चोप दिला या ठिकाणी इतर नागरिक ही जमा झाले त्यांनीही या मद्यसेवन केलेल्या टवाळखोळ युवकाला अंगावरील कपडे फाटेपर्यंत चोप दिला.

घटनेची माहिती समजतात इंदिरानगर पोलीस स्टेशनचे (Indiranagar Police Station) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जखमी झालेल्या या युवकाला जिल्हा शासकीय रुग्णालय (District Government Hospital) मध्ये दाखल करण्यात आले आहे. इंदिरानगर पोलीस स्टेशन ला संपर्क साधला असता युवक हा मद्य (alcohol) सेवन केलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. शहरात गुन्हेगारीच्या घटना घडत असतानाच पाथर्डी परिसरात रोड रोमियोंनी डोके वर काढले आहे.

परिसरात असलेल्या मद्य विक्री (Liquor sale) करणाऱ्या दुकानासमोरच अनेक युवक मद्यसेवन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा दुकानांसमोर मद्यसेवन सेवन करणाऱ्या व मुलींची छेडछाड करणाऱ्यांना टवाळ पोरांवर पोलिसांनी आपला खाक्या दाखवत युवकांना वठणीवर आणणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com