स्वच्छतागृहांची दुरवस्था; दुर्गंधीने नागरिक त्रस्त

स्वच्छतागृहांची दुरवस्था; दुर्गंधीने नागरिक त्रस्त

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Devali Camp

येथील लॅमरोड परिसरात (Lamrod area) नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे यातून निघणार्‍या मूत्रमिश्रित पाण्याने रस्त्यावर (Road) दुर्गंधी फैलावत आहे...

कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून लॅमरोडवरील सावला कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिर, कोठारी सॅनेटरियम, जमाल नाला, संसरी नाका, रेस्ट कॅम्प रोड, विजयनगर आदी ठिकाणी या पत्र्याच्या मुतार्‍या बसविण्यात आल्या आहे. त्यापैकी बर्‍याच प्रसाधनगृहांचे (Restroom) आतील भांडे तुटले आहे. तर काहींची पाईपलाईन तुटली असल्याने ही दुर्गंधीची समस्या निर्माण होते.

दरम्यान, आरोग्य विभागामार्फत (Department of Health) या प्रसाधनगृहांची नियमित देखभाल करणे गरजेचे असताना ती होत नाही. या समस्येबाबत नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागास वारंवार सांगून देखील हे कामे होत नसल्याने दुर्गंधी पसरण्याचा प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com