विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त, विद्युत मंडळाच्या कार्यालयाला चिटकवले निवेदन

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त, विद्युत मंडळाच्या कार्यालयाला चिटकवले निवेदन

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशिक परिसर, खुटवड नगर, कामटवाडे, अंबडसह संपूर्ण भागात मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. कधीही वीज येते आणि कधीही जाते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट विद्युत मंडळाचे कार्यालय गाठले. मात्र येथील आधिकारी सुट्टीवर असल्याने त्यांच्या कार्यालयाचा दरवाजालाच निवेदन चिटकवले.

कामटवाडे, दुर्गा नगर, धन्वंतरी मेडिकल कॅालेज परीसर, इंद्रनगरी, अभियंता नगर, वावरे नगर, खुटवड नगर, कमल नगर, बंदावणे नगर,-गोपालक्रुष्ण नगर, डीजीपी नगर, सिडको, अंबड, पाथर्डी फाटा परीसरातील नागरीकांना दररोज वीज मंडळाच्या मनमानीचा त्रास सहन करावा लागतो आहे. सतत वीज पुरवठा खंडित होणे ही आता डोकेदुखी ठरू लागली आहे. गणेश उत्सवातही परीसरातील नागरीकांना १० दिवसांत तब्बल चार-पाच तास विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागला.

वीज वितरण कंपनीच्या आधिका-यांकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी वीज मंडळाचे कार्यालय गाठले. मात्र या ठिकाणचे आधिकारी सुट्टीवर असल्याचे कळल्याने त्यांनी दरवाजालाच निवेदन चिकवीत संताप व्यक्त केला असून यापुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख पवन मटाले यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आले.

यावेळी साधना मटाले, मनीषा ह्याळीज, अनिता वरुडे, स्नेहा थोरात, पल्लवी सोळंके, रोहित शिंदे, अविनाश काकडे, दिग्विजय सोनवणे, जयेश चौधरी, ओम दानीज, चैतन्य कानडे, बाळा कारभारी आदी उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com