टोइंग ठेक्यास मुदतवाढ; नाशिककर नाराज

टोइंग ठेक्यास मुदतवाढ; नाशिककर नाराज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

'नो पार्किंग झोन'मधील (No Parking Zone) दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलण्याच्या ठेक्याची मुदत (Deadline) गुरुवारी संपल्याने शुक्रवारी दिवसभर टोइंगची (Towing) कारवाई बंद होती...

आगामी महापालिका निवडणूक (NMC Election), कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर टोइंगच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन महिने अर्थात १० एप्रिल २०२२ पर्यंत टोइंगची कारवाई केली जाणार आहे.

शहरात नो पार्किंगच्या (No Parking) ठिकाणीही वाहने (Vehicles) उभी राहत असल्याने रहदारीला अडथळा होत असतो. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला, नो पार्किंग झोनची निर्मिती करूनही याच ठिकाणी सर्रास वाहने उभी असल्याचे चित्र सर्वाधिक असते.

बेशिस्त वाहनचालकांविरोधात शहर पोलिसांनी (Police) कारवाईचा बडगा उगारला असून, नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केल्यास 'टोइंग'च्या माध्यमातून दंड (Fine) वसूल केला जातो. मात्र, टोइंग कर्मचाऱ्यांच्या असभ्य व उद्धट वर्तनामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडतात.

स्मार्ट सिटीची (Smart City) कामे आणि वाहनतळाचा अभाव यामुळे टोइंग कारवाईला वाहनधारकांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. वाहनधारकांच्या तक्रारी कायम असताना, टोइंग कारवाईला मुदतवाढ दिल्याने सर्वसामान्य नाशिककरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com