मातीची सुपीकता जपण्याचा शेतकर्‍यांसह नागरिकांकडून संकल्प

मालेगाव तालुक्यातील पाटणे फाट्यावर सद्गुरूंचे अभुतपुर्व जल्लोषात स्वागत
मातीची सुपीकता जपण्याचा शेतकर्‍यांसह नागरिकांकडून संकल्प

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

‘माती वाचवा’ अभियान ( Save Soil Campaign ) हाती घेत अनेक देशांचा प्रवास करून भारतात आगमन झालेल्या ईशा फाऊंडेशनचे संस्थापक श्री सद्गुरू ( Shri Sadguru ) अर्थात् जग्गी वासुदेव ( Jaggi Vasudev ) यांचे काल दुपारी मालेगाव ( Malegaon) तालुक्यातील पाटणे फाट्यावर, न्यू सुखसागर हॉटेल ( New Sukhsagar Hotel ) परिसरात अभुतपुर्व स्वागत करण्यात आले.

दै.‘देशदूत’ व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संयुक्त वतीने ईशा फाऊंडेशनचे श्री सद्गुरू (जग्गी वासुदेव) यांच्या ‘माती वाचवा’ कार्यक्रमाचे काल (दि. 11) सायंकाळी 4 वाजता केटीएचएम महाविद्यालय प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. माती नापिक होण्यापासून वाचविण्यासाठी सुरू झालेली ही मोहिम जागतिक स्तरावर नेण्यासाठी सद्गुरूंनी शंभर दिवसांचा मोटारसायकल प्रवास सुरू केला आहे. त्याची सुरवात लंडन येथून झाली असून 27 राष्ट्रांना भेटी देत ते 30 हजार कि.मी. प्रवास करून कावेरी खोर्‍यात मोहिमेचा समारोप करणार आहेत.

या मोहिमेंतर्गत आज नाशिक येथे आयोजित कार्यक्रमास मालेगावमार्गे रवाना होणार असल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे त्यांच्या जंगी स्वागताचा कार्यक्रम मुंबई-आग्रा महामार्गावरील पाटणे फाट्याजवळ न्यू सुखसागर हॉटेल परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त महामार्गावर ठिकठिकाणी परिवहन विभागातर्फे स्वागत फलक लावण्यात आले होते. तसेच कार्यक्रमस्थळी माती वाचवा अभियानाचे भव्य फलक, छोटेखानी व्यासपिठ उभारून रंगीबेरंगी फुग्यांनी सजावट करण्यात आली होती. शेजारीच डिजीटल स्क्रिनवर सद्गुरूंच्या मोहिमेतील प्रवास तसेच झालेल्या कार्यक्रमांच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येत होत्या. याशिवाय सद्गुरूंसाठी रेड कार्पेटही टाकण्यात आले होते.

श्री. सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या आगमनापुर्वी ईशा फाऊंडेशनचे स्वामी विलासन, कविता पसारिया, अरूण मेहता, शैलेश व्यंकटेशन आदींनी कार्यक्रमस्थळी भेट देत नियोजनाची पाहणी केली. सद्गुरूंच्या स्वागतासाठी सकाळी 11 वाजेपासूनच विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील शेतकरी व महिलांसह बालगोपाळ मोठ्या संख्येने महामार्गाच्या दुतर्फा हातात माती वाचवा अभियानाचे फलक घेवून सज्ज झाले होते.

श्री. सद्गुरू यांचे दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास न्यू सुखसागर हॉटेल परिसरात आगमन होताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव व आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून टाळ्यांच्या कडकडाटात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, युवा सेनेचे नेते अजिंक्य भुसे, सामाजिक कार्यकर्ते महेश पाटोदिया, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, आम्ही मालेगावकर संघर्ष समितीचे निखील पवार, देवा पाटील आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी पुष्पहार देत सद्गुरूंचे स्वागत केले. सकाळपासून उन्हाची तीव्रता असतांना नेमके सद्गुरूंचे कार्यक्रमस्थळी आगमन होण्याच्या वेळीच अभ्राच्छादित वातावरण निर्माण होवून वरूणराजानेही अल्पशी हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण करून सद्गुरूंचे स्वागत केले.

माती वाचवा मोहिमेंतर्गत मोटारसायकलने 30 हजार कि.मी.चा प्रवास करतांना सद्गुरू हेल्मेटचा आवुर्जन वापर करीत आहेत. त्यामुळे माती वाचविण्याच्या संदेशाबरोबरच सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटची उपयुक्तता देखील सद्गुरू जनमाणसात रूजवित असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक लावण्याबरोबरच स्वागत समारंभाचे आयोजन केले गेले. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संगपाल कदम, विजय बटवल, राजू महाजन, दिलीप आव्हाड यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले. त्यांना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही विशेष सहकार्य दिले.

श्री. सद्गुरूंच्या स्वागतास अजय मंडावेवाला, ओमप्रकाश बाहेती, रामदास बोरसे, कैलास शर्मा, हर्षद भामरे, अमित खरे, डॉ. अरूण पठाडे, पोपटराव सोनवणे, विवेक वारूळे, आनंदसिंग ठोके, भरत आखाडे, ज्ञानेश्वर भावसार, भावेश भावसार, महेश बोरसे, शुभम सोनवणे, प्रताप शेवाळे, जगन्नाथ शेवाळे, बापू अहिरे, प्रताप वाघ, जय वाघ, गणेश जाधव, अथर्व वाघ, अभय गोरे, प्रियांश गोरे, धनुष गोरे, दीपा बाहेती, अनीता मंडावेवाला, नयना गोरे, उज्वला बोधले, अंजना जाधव, सुवर्णा वाघ, स्वाती वाघ, संगीता जाधव, अरूणा वाघ, दिनकर वाघ, रेखा काकड, सपना बुटे, श्रध्दा सगरे, स्नेहल वाळेकर, तनिषा लोहारकर, गोपी वडनेरे, यशवंत खैरनार, अभय गोरे, रोहित बहुतकर, मयुर वांद्रे, अमोल येवले, यशपाल बागुल, केतन बच्छाव, चेतन बच्छाव, सुजीत वाळेकर, अजय मंडाळे आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक क्षेत्रातील शेकडो मान्यवरांसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.

‘सुखसागर’ने जपली बांधिलकी

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक ( Isha Foundation )श्री. सद्गुरू हे भारतासह अनेक देशात माती वाचवा अभियान राबवित आहेत. न्यू सुखसागर हॉटेलचे संचालक देखील प्रगतशील शेतकरी, भुमीपूत्र असल्याने हॉटेल व्यवस्थापन सद्गुरूंच्या स्वागताला विशेषत्वाने पुढे सरसावले होते. अनिल जाधव, प्रविण जाधव, भगवान जाधव, नानाभाऊ वाघ, बाळू जाधव आदींसह न्यू सुखसागर हॉटेलच्या सेवकांनी सद्गुरूंच्या स्वागतासाठी सकाळपासून दाखल होणार्‍या शेतकरी व कार्यकर्त्यांसाठी चहापाण्यासह अल्पोपहाराची मोफत सुविधा उपलब्ध करून उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com