भारत जोडो यात्रेनिमित्ताने 'या' तारखेला होणार नागरिक सभा

भारत जोडो यात्रेनिमित्ताने 'या' तारखेला होणार नागरिक सभा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

खा.राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते कश्मीर (Kanyakumari to Kashmir) भव्य पदयात्रा सुरू केली आहे.

सुमारे ३५०० हजार किमी ही यात्रा संपन्न होणार असून, मोठ्या संख्येने सर्व थरातील नागरिकांचा उस्फूर्त पाठींबा मिळत आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) सर्व पुरोगामी जनसंघटना, नागरीक, कार्यकर्ते यांच्या सिव्हिल सोसायटीने देखील सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ८) हुतात्मा स्मारक, नाशिक (Martyrs Memorial, Nashik) येथे जनसंघटना पदाधिकारी व प्रतिनिधींनी राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ज्ञानेश्वर काळे, रमेश साळवे, मनोहर आहिरे, नितीन मते,

मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, निशिकांत पगारे, निसारभाई पटेल, इसाकभाई कुरेशी, अशोक शेंडगे, डाॅ.महेंद्र नाकिल, समाधान बागूल, कल्याणी आहिरे, भुषण काळे, प्रविण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मनोहर आहिरे तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर काळे यांनी मानले.

नेहरू जयंतीचे औचित्य

महाराष्ट्रात (maharashtra) दि. ७ नोव्हेंबरला दाखल झालेल्या यात्रेच्या समर्थनार्थ नाशिक (nashik) शहरात कृती कार्यक्रम घेण्यासंबंधी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वानुमते दि.१४ नोव्हेंबर नेहरू जयंती दिनी संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, नाशिक येथे सायंकाळी ४ वाजता "नागरिक सभा" आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com