सिटीलिंकतर्फे चालक व वाहकांना दिले जात आहे 'या' विषयाचे धडे

सिटीलिंकतर्फे चालक व वाहकांना दिले जात आहे 'या' विषयाचे धडे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिटीलिंक (Citylink) व प्रवाशांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षितरित्या व सुखकर प्रवास (safe and pleasant journey) करता यावा यासाठी सिटीलिंकने चालक व वाहकांसाठी (drivers and carriers) प्रत्येक रविवारी मार्गदर्शन शिबिराचे (uidance camp) आयोजन करण्यात येत असून

रविवार या प्रशिक्षण शिबिराचा (guidance camp) दूसरा टप्पा पूर्ण झाला. सिटीलिंक (Citylink), पोलिस प्रशासन (Police Administration) व नाशिक फस्ट (Nashik First) यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिटीलिंक मधील बस चालकांना (bus drivers) विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सिटीलिंक मुख्यालय, त्र्यंबकरोड याठिकाणी हे मार्गदर्शन शिबीर पार पडले. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण दोन सत्रात हे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात मोटिव्हेशनल ट्रेनर (Motivational Trainer) व द आर्ट ऑफ सक्सेसचे संचालक अभय बाग (Abhay Bagh Director of The Art of Success) यांनी उपस्थित चालकांना ट्राफिक अवेअरनेस (Traffic Awareness) व पर्सनालिटी डेव्हलपमेंट (Personality Development) या विषयावर मार्गदर्शन केले.

यामध्ये बस चालविताना चालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, चालकांची प्रवासी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांप्रती असलेली जबाबदारी, प्रवाशांसोबत असलेले सकारात्मक वर्तन, प्रवाशांसोबत संभाषण करतांना मनावर संयम ठेवण्याबरोबरच आपली बस स्वच्छ ठेवणे, फेरी सुरू करण्यापूर्वी बसचे पार्ट तपासून घेणे अशा अनेक मुद्द्यांवर चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

दुसर्‍या सत्रात वाहतूक शाखा युनिट २ चे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब शेळके यांनी चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी शेळके यांनी वाहतुकीचे नियम समजावून सांगताना वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आर टी ओ नियमांचे पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे हे प्रत्येक चालकाची जबाबदारी असल्याचे शेळके यांनी संगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com