दोन नव्या मार्गांवर सिटीलिंक बससेवा

दोन नव्या मार्गांवर सिटीलिंक बससेवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि.कडून (CITILNK) नव्या दोन मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी बससेवा सुरू करण्यात येत आहे. तपोवन ते बेळगाव ढगा ( Tapovan To Belgaon Dhaga) व तपोवन ते चुंचाळे ( Tapovan To Chunchale )या दोन मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

बससेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : तपोवन ते बेळगाव ढगा - सकाळी 5.35 वाजता. बेळगाव ढगा ते निमाणी - सकाळी 6.30, दुपारी 12.35 व सायं.17.40 वाजता या वेळात सुरू करण्यात येत आहे. तर निमाणी ते बेळगाव ढगा - सकाळी 10.30, सायंकाळी 16.45 वाजता. बेळगाव ढगा ते सातपूर - सकाळी 11.30 वाजता

तर सातपूर ते बेळगाव ढगा - दुपारी 12.00 वा. तपोवन ते चुंचाळेगाव - सकाळी 5.50 वाजता. चुंचाळे गाव ते बारदान फाटा - सकाळी 6.45, दुपारी 13.00 वाजता, बारदान फाटा ते चुंचाळे गाव - दुपारी 12.05, सायंकाळी 17.15 वाजता, तसेच चुंचाळे ते तपोवन मार्गे सातपूर सायंकाळी 17.55 वाजता.

याशिवाय बारदान फाटा ते पाथर्डी गाव - 7.30, 9.50, 12.05, 13.45 वाजता तर पाथर्डी गाव ते बारदान फाटा मार्गे गरवारे, सीमेन्स, एक्सलो पॉईंट, कदम भवन, पपया नर्सरी - 8.40, 11.00, 15.00 वाजता बस फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com