सिटीलिंक बसचालक,वाहकाचा असाही प्रामाणिकपणा

सिटीलिंक बसचालक,वाहकाचा असाही  प्रामाणिकपणा

नशिक | Nashik

शहरात सुरु असलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंक बस (citilink bus) चालकांचा प्रामाणिकपणा समोर आला असून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवाशांच्या (Passengers) सापडलेल्या वस्तु आणि रोकड संबधित प्रवाशांना पुन्हा परत करण्यात आली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (दि.१९) रोजी तपोवन आगरातील (Tapovan Agra) बसचालक मेघराज जाधव (Meghraj Jadhav) हे मार्ग क्रमांक १३० निमाणी ते भगूर (Nimani to Bhagur) या बस फेरीवर कामगिरी बजावत असतांना त्यांना बसमधील एका सीटवर कापडी पिशवी निदर्शनास आली. त्यानंतर जाधव यांनी ती पिशवी तपासली असता त्यात रामप्रभू वाणी नामक व्यक्तीच्या बँक पासबुकसह १९ हजारांची रोकड मिळून आली.

यानंतर मेघराज जाधव यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत ती पिशवी सिटीलिंक कार्यालयात जमा केली. तसेच सिटीलिंक कार्यालयाने तात्काळ प्रवाशी रामप्रभू वाणी (Ram Prabhu Vani) यांच्याशी संपर्क साधत त्यांना सिटीलिंक कार्यालयात बोलावून घेत संपूर्ण खातरजमा केल्यानंतर बँक पासबुक आणि १९ हजारांची रोकड परत केली. तसेच मोठी रक्कम असल्यामुळे पैसे परत मिळतील अशी आशा मी सोडून दिली होती. मात्र सिटीलिंक बसचालकांचा प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे वाणी यांनी सांगितले.

तर दुसर्‍या घटनेत मार्ग क्रमांक १०९ ए सिम्बिओसिस कॉलेज ते निमाणी (Symbiosis College to Nimani) या मार्गावर कामगिरी बजावत असलेले बसवाहक मनोहर गायकवाड (Manohar Gaikwad) यांना देखील बसमध्ये चालू अवस्थेतील रेड मी ४ (Red Me 4) हा मोबाईल आढळून आला.

त्यावेळी वाहक गायकवाड यांनी लगेच निमाणी बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कल्पेश ठाकुर यांच्या निदर्शनास आणून दिल्यांनतर तपासणी केली असता सदर मोबाइल सौरभ चौधरी या प्रवाशाचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांचा मोबाईल संपूर्ण खातरजमा करून परत करण्यात आला. त्यामुळे प्रवासी सौरभ चौधरी यांनी सिटीलिंकचे आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com