सिटीलिंकचा प्रवास होणार आता अत्याधुनिक, पासधारकांना आता 'हे' पास मिळणार

सिटीलिंकचा प्रवास होणार आता अत्याधुनिक, पासधारकांना आता 'हे' पास मिळणार

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक च्यामाध्यमातून आता पास धारकांसाठी सर्वसाधारण पास कार्ड ऐवजी आरएफआय कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या पासेसची नोंदणी तपासणी ऑनलाईन पध्दतीने केली जाणार आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ ही कार्डची मुदत असली तरी दिनांक २५ ऑक्टोंबर २०२३ पासून कार्ड सिटीलिंक मुख्यालय येथील पास केंद्र येथून दिव्यांग व्यक्तींना कार्ड वितरित करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत सिटीलिंकच्या वतीने विद्यार्थी सवलत पास ( मासिक, त्रैमासिक पास, ठराविक मार्गाचे पास, ओपन एंडेड पास, वन डे पास, दिव्यांग मोफत पास) या प्रवाश्यांना सर्वसाधारण पास देण्यात येत होते. परंतु आता या सर्व पास धारकांना सर्वसाधारण पास कार्ड ऐवजी आरएफआय कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या यंत्रणेमुळे पासधारकांना आरएफआय कार्ड दिल्यास वाहकांच्या मशीनमध्ये नोंद होणे सोयीचे होईल. कार्ड स्कॅन केल्यामुळे बसमधील प्रवासी संख्या किती आहे, हे वाहकास लगेच अवगत होईल. सद्यस्थितीत पासधारकांना जे पास दिले जातात ते स्कॅन होत नसल्याच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारींना आळा बसेल. सध्या दिल्या जाणाऱ्या पासचा गैरवापर होऊ शकतो. परंतु आरएफआय कार्डचा गैरवापर होऊ शकत नाही. आरएफआय कार्ड लवकर स्कॅन होऊन त्याची वैधता तपासणे वाहकास सोयीचे होणार आहे.

तसेच, दिव्यांग व्यक्तींना १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ कालावधीकरिता आरएफआय कार्ड वितरित करण्यात येणार आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ ही कार्डची मुदत असली तरी दिनांक २५ ऑक्टोंबर २०२३ पासून कार्ड सिटीलिंक मुख्यालय येथील पास केंद्र येथून दिव्यांग व्यक्तींना कार्ड वितरित करण्यात येणार आहे. हे कार्ड वितरित करण्यात आले तरी सदर कार्डचा मात्र १ जानेवारी २०२४ पासूनच वापर करता येणार असून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंन्त सध्या उपलब्ध पासचाच प्रवासासाठी वापर करता येणार आहे.

चालू स्थितीतील पास सिटीलिंक कार्यालयात जमा करण्याची मुदत २ महीने असून २ महिन्यात सदर पास कार्यालयात जमा न केल्यास संबधित पासधारकाचे आरएफआय कार्ड देखील इनअ‍ॅक्टिव करण्यात येईल. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. नवीन आरएफआय कार्ड सिटीलिंक मुख्यालय, पास केंद्र याठिकाणी वितरित करण्यात येणार वरील पद्धतीप्रमाणे आरएफआय कार्डचे वितरण करण्यात येणार असल्याचे सिटी लिंकच्या वतीने कळविण्यात आले आहे.

काय आहे आरएफआय कार्ड

रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आरएफआय कार्ड. ही स्वयंचलित ओळख आणि डेटा कॅप्चरची एक पद्धत आहे. रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन ऑब्जेक्ट्सशी जोडलेले टॅग स्वयंचलितपणे ओळखण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वापरते. या प्रणालीमध्ये एक लहान रेडिओ ट्रान्सपॉन्डर, रेडिओ रिसीव्हर आणि ट्रान्समीटर असते. जवळच्या रीडर यंत्रावरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक चौकशी नाडीने ट्रिगर केल्यावर, टॅग डिजिटल डेटा पाठवतो.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com