सिटीलिंक बसच्या वाहकाला मारहाण; मुलीची छेड काढणाऱ्या तरुणांना हटकल्याने घडली घटना

सिटीलिंक बसच्या वाहकाला मारहाण; मुलीची छेड काढणाऱ्या तरुणांना हटकल्याने घडली घटना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुलींची छेड काढत असलेल्या मुजोर तरुणांना हटकले असता राग अनावर झाल्याने वाहकाला मारहाण केल्याची घटना आज गिरणारे गावात (Girnare gaon) घडली. याप्रकरणी कडक कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे....

अधिक माहिती अशी की, नाशिक गिरणारे (Nashik Girnare bus) बसमध्ये दोन तरूण एका विद्यार्थिनीची छेड काढताना बसच्या वाहकाला दिसले. या वाहकाने मुलीला बसमध्येच बसायला सांगितले. बसमध्ये कॅमेरे असून तू इथे सुरक्षित राहशील असे वाहकाने विद्यार्थिनीला सांगत दोघा तरुणांना हटकले.

यानंतर तू मध्ये का पडला असे म्हणत या तरुणांनी वाहकाला मारहाण केली. यानंतर चालकदेखील या वाहकाच्या मदतीला धावला. मात्र, घटनास्थळावरून या तरुणांनी पळ काढला.

प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थिनी व दोघे तरुण गिरणारे गावातील शाळेतील किंवा महाविद्यालयातील असल्याचे समजते. हा प्रकार गंभीर असून पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com