मनपा अतिरिक्त आयुक्तपदी चौधरी

मनपा अतिरिक्त आयुक्तपदी चौधरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) अतिरीक्त आयुक्त पदी प्रदीप चौधरी (Pradeep Chaudhary as Additional Commissioner) यांनी पदभार स्विकारला आहे. प्रभारी आयुक्त असलेल्या डॉ. अर्चना तांबे यांनी त्यांचे स्वागत केले.

ऑगस्ट महिन्यांत नाशिक महापालिकेतील अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे (Additional Commissioner Suresh Khade) हे मुळ सेवेत दाखल झाल्याने या पदाचा अतिरीक्त कारभार डॉ. अर्चना तांबे यांच्याकडे देण्यात आला होता.

दरम्यान शासनाकडून झालेल्या काही बदल्यांमध्ये नाशिक महापालिकेत अतिरीक्त आयुक्त म्हणून अरुण आनंदकर येणार असल्याचे निश्‍चित झाले होते. परंतु आनंदकर यांनी हा पदभार स्विकारला नसल्याने या जागी प्रदीप चौधरी यांचे नाव निश्‍चित झाले.

चौधरी यांनी यांपूर्वी महापालिकेत उपायुक्त म्हणून कारभार बघितला आहे. यावेळी उपायुक्त तथा प्रभारी आयुक्त डॉ. अर्चना तांबे, प्रशासन उपायुक्त मनोज घोडेपाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com