इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या अध्यक्षपदी चोपडा व सचिवपदी मेहता

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या अध्यक्षपदी चोपडा व सचिवपदी मेहता
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (Institution of Engineers) (इंडिया) नाशिक लोकल सेन्टरच्या (Nashik Local Centre) अध्यक्षपदी महावीर चोपडा व मानद सचिवपदी विपुल मेहता यांची दोन वर्षासाठी (2022-24) निवड करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) नूतन कार्यकारिणीचे सदस्य म्हणून अंजली आडे, दिपक पंजाबी, महेंद्र शिरसाट, महेश संघवी, वेदांत राठी, दीपक पाटील, धनंजय ओढेकर, गौरव धारकर, संतोष संचेती, वैभव नागसेठीया यांची बिनविरोध निवड (Uncontested choice) झाल्याची घोषणा करण्यात आली.

नवनिर्वाचित सदस्याचे स्वागत व अभिनंदन अध्यक्ष सुमित खिंवसरा व मानद सचिव समीर कोठारी यांनी केले. याप्रसंगी महेंद्र कोठारी, विजय कोठारी, मनीष कोठारी, नरेंद्र बिरार, संतोष मुथा, दिलीप ओढेकर, धीरज पिचा, मंगेश गांधी, पियुष सिसोदिया, विपुल नेरकर आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com