शोधावे तिथे सुख! रस्त्याचे काम 'लॉकडाऊन'
नाशिक

शोधावे तिथे सुख! रस्त्याचे काम 'लॉकडाऊन'

ग्रामस्थांनी शोधला खड्ड्यांवर उपाय

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इगतपुरी |प्रशांत निकाळे

९ जानेवारी २०२० ला गावात पहिल्यांदा रस्त्याच काम सुरु झाले. थेकेदाराने खडी, माती, रस्ता आखल्या प्रमाणे गावात पसरवली.

काम सुरु झाल तेच करोनामुळे टाळेबंदी घोषित झाली. गावात रस्त्यचे काम थांबले. चार पाच महिने उलटले, तोच पाऊस सुरु झाला. बघता बघता गावात सर्वत्र चिखल झाला.

गावातील मोठी मंडळी पार हैराण झाली. छोट्यांच्या डोक्यात मात्र वेगळीच शक्कल. मग काय, गेले रानात दोन झाड झाडाच्या फांद्या तोडल्या.

बेचकी बनवता येईल अशी एक छोटी खाच ठेवली. ऊंची पर्यंत येइल एवढी फांदी ठेवली. दोन्ही फांद्या सारख्याच ठेवल्या. बेचकी सारख्या खाचेवर पाय ठेवले आणि स्वारी चिखलात न लागता गावभर फिरू लागली. एक दोन दिवस होत नाही तेच सगळी लहानगी, दांडूक्यांच्या खेळात रमली.

चिचले खैरे, इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग. गावात जाण्यासाठी रस्ता ही नाही, ना पाण्याची सोय, ना विज, ना दवाखाना अशी परिस्थिती आहे.

गावात शाळा ही सातवी पर्यंत त्यानंतर थेट तालुक्याच्या ठिकाणी शाळेसाठी पायपीट करावी लागते. तरीदेखील येथील ग्रामस्थ अतिशय आनंदाने जीवन जगत आहेत.

याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकालाच असा प्रश्न पडल्याबिगर राहत नाही, सोयी सुविधा नसूनही येथील नागरिक आनंदी आहेत. याचे कारण म्हणजे येथील जनता जगण्याच्या प्रत्येक क्षणात ही लोक सुख शोधताना दिसते.

Deshdoot
www.deshdoot.com