
चिंचखेड | वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन कडेकोट बंदोबस्त ठेवून आहेत...
पहिल्या दोन तासांत १५ टक्के मतदान झाले असून आणखीही मतदार घरातून बाहेर पडले असून मतदानाचा टक्का वाढणार आहे.
गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग ठेवून मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी देशदूत सोबत बोलताना यासंदर्भात अधिक माहिती दिली.