बालसाहित्यिक मेळावा यशस्वी करणार

कार्यवाह संंजय करंंजकर, हुदलीकर यांचा विश्वास
बालसाहित्यिक मेळावा यशस्वी करणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाच्या 94th All India Marathi Literay Convention 93 वर्षांच्या इतिहासात बालसाहित्यिक मेळावा Children's Literature Festival होण्याचा यंदाचा पहिलाच प्रसंंग असून, हा मेळावा अभूतपूर्व व्हावा व पुढील प्रत्येक साहित्य संमेलनात त्याचा सन्मानाने उल्लेख व्हावा, असाच आम्हा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न आहेे. त्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ, असा विश्वास साहित्य संमेलनाचे कार्यवाह संंजय करंंजकर Sanjay Karanjkar व बाल साहित्यिक मेळावा आयोेजन समितीचे प्रमुख प्रसिद्ध साहित्यिक संतोष हुदलीकर Santosh Hudlikar यांनी व्यक्त केला.

‘देशदूत साहित्यिक कट्ट्या’वर आज त्यांची प्रकट मुलाखत देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी घेतली. त्यावेळी त्यांंनी साहित्य संमेलनात प्रथमच होत असलेल्या बालसाहित्य मेेळाव्याची सविस्तर माहिती दिली.

बालकुमार साहित्य संमेलनाचे स्वरुप विशद करताना हुदलीकर म्हणाले, साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच असा मेळावा होत आहे. यापुढे प्रत्येक संंमेलनात असा मेळावा होण्यासाठी तो पथदर्शक ठरणार आहे. नाशिक येथील 4 व 5 डिसेेंबरला बालमेळावा होईल. त्यासाठी 17 समित्या कार्यरत आहेत.

करंजकर म्हणाले की, सावाना ही नाशिकची सांस्कृतिक ओळख आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मुलांवर काम केले पाहिजे. अशी आमची नेहमीच भूमिका राहिली आहे. म्हणूनच बालकुमार साहित्यिक मेळाव्याची संकल्पना पुढे आली. स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्या कल्पनेला बळ देऊन सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे समिती सदस्यांंचा उत्साह द्विगुणीत झाला.

बालभवनाचे सर्व सदस्य कार्यरत झालेे. या मेळाव्याच्या आयोजनाबाबत हुदलीकर म्हणाले की, बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होईल. दुपारी काव्य मेळावा होईल. सायंकाळी बालकविंचे म्हणजे ज्या कवींनी बालकांसाठी कविता रचल्या त्यांचे कवी संमेलन होईल. तसेच देश-विदेशातील कविंचे व्हिडिओेचे सादरीकरण केले जाईल.

दुसर्‍या दिवशी ‘बदलत्या काळातील बालसाहित्य’ यावर चर्चासत्र होईल. त्यात नामवंत साहित्यिक सहभागी होतील. मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असेल. चार ते सहा तास हा मंच बालकांच्या ताब्यात राहील, असाच आमचा प्रयत्न आहे. मुले बिनधास्त प्रश्न विचारतील. त्यांना साहित्यिक उत्तरे देतील. त्यानंतर ‘बालसाहित्य व मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास’ यावर नाशिकचे सचिन विलास जोशी व विदर्भातील सचिन जोशी दोघे शिक्षणतज्ज्ञ चर्चेत सहभागी होतील.

डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या संमेलनात विज्ञानाचा स्पर्श होईल, याची खबरदारी संयोजकांनी घेतली आहे. त्यासाठी खगोल ते भूगोल हा विषय शास्रज्ञ राजीव तांबे व आनंंद घैसास यांच्या खुसखुशीत चर्चेतून समजावून सांगितला जाणार आहे. ते मस्तपैकी गप्पा गोष्टी करतील व त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर डॉ. सुनील कुटे हे कल्पनांंमधील विज्ञान व नावीन्यता या विषयावर मार्गदर्शन करतील. बालसाहित्यिक मेळाव्याचा समारोप नृत्यांंगना स्मृती अथनी व त्यांंच्या शिष्यांंच्या उपस्थितीत कुसुमाग्रज काव्य नृत्यानुभवाने होईल, असे ते म्हणाले.

सोहळा अतिशय रंंगतदार व्हावा. प्रत्येक कार्यक्रमाला किमान एक हजाराच्या जवळपास विद्यार्थी उपस्थित राहावे. मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी. वैज्ञानिक वैचारिक मूल्यांंची रुजवात व्हावी. हाच बालसाहित्यिक मेळाव्याचा उद्देश असून तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही, असे हुदलीकर व करंंजकर यांनी स्पष्ट केले. यावेळी अ‍ॅॅड. रमेश कुशारे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com